आशीष राणे
वसई : संपूर्ण जगभर, देशोदेशी व खासकरून वसई धर्मप्रांतात साजरा होणारा ख्रिस्ती बांधवांच्या आदराचे प्रतीक असलेला पवित्र नाताळ सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नाताळ हा येशूंचा जन्मदिवस असल्याने शहरातील ख्रिस्त बांधवांमध्ये या सणानिमित्तअतिशय आदरयुक्त उत्साह दिसून येत आहे.
वसईत हा पवित्र सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा होत असतो. या पार्श्वभूमीवर वसई, नायगाव, खास करून पश्चिम पट्टा विरार-नालासोपारा ग्रामीण-शहरातील बाजारपेठा विविध वस्तू ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, फराळ, मेणबत्ती, विविध प्रकारचे केक, कलकल आदी असंख्य वस्तूंनी बाजारपेठ, बेकऱ्या सज्ज झाल्या आहेत. त्यातच वसईच्या असंख्य चर्चमध्ये साफसफाई रंगरंगोटी पूर्ण झाली असून त्यावर आता आकर्षक रोषणाईची चादर चढवली जात आहे. वसई गाव, पापडी, माणिकपूर आदी शहरातील चर्चेसच्या बाहेरील आवारात दुकाने वस्तूंनी आकर्षक कंदिलांनी सजली आहेत. खास करून स्टेला येथील बिशप हाऊससोबत खास चर्चेसच्या आवारात सजावटीच्या, रंगरंगोटीच्या कामाने वेग घेतला असून त्यावर विद्युत रोषणाई लावली जात आहे.एकूणचवसईत विविध चर्चेसच्या आवारात लागलेल्या दुकानांवर नाताळ सजावटीचे ख्रिसमस ट्री, हॉली रिट, बेल्स, सांताक्लॉज टॉकिंग्स, सांताक्लॉज फेस, प्रभू येशू व मेरी यांच्या छोट्या-मोठ्या मूर्ती, रंगीबेरंगी झालरी, चांदणी, खेळणी, चमकी, पन्नी यासारखे सजावटीचे साहित्य घेण्यास या ख्रिस्ती नागरिकांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. या वेळी चर्चेसच्या बाहेरील आवारात विक्र ी करणारे ज्येष्ठ गृहस्थ अल्बर्ट अंकल यांनी नाताळच्या पूर्वतयारीसाठी सजावटीच्या साहित्यासह शुभेच्छा पत्रे, खाद्यपदार्थ, नवीन कपडे यांच्या खरेदीला ख्रिस्ती नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. दुसरीकडे नाताळनिमित्त मिठाई आणि विद्युत रोषणाईसाठी लागणाºया विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज आहेत.नाताळ आला सांताबाबा आलावसई परिसरात बहुतांशी ख्रिस्ती बांधव, लहान मुले संध्याकाळच्या वेळेत विविध गल्लीबोळात, हौसिंग सोसायटीत फिरून प्रार्थना व नाताळ गीते सादर करताना दिसून येत आहेत. ‘नाताळ आला सांताबाबा आला’ अशी नाताळ गीते ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहेत.