शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

मंगल कार्यालय गेले पाड्यामधून ‘चोरीस’

By admin | Published: September 19, 2016 3:00 AM

आदिवासी विकास प्रकल्प विभागाची तब्बल ९ लाख ९९ हजार ५३० रुपये मूल्याच्या मंगल कार्यालयाची इमारतच ‘चोरी’ला गेली

हितेन नाईक,

पालघर- जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील खुडेद गावातील घोडीचा पाडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाची तब्बल ९ लाख ९९ हजार ५३० रुपये मूल्याच्या मंगल कार्यालयाची इमारतच ‘चोरी’ला गेली असून संबधित दोषीं विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ठक्कर बाप्पा योजनेद्वारे तीन वर्षात जिल्ह्यातील कामांचे आयआयटी मुंबईमार्फत आॅडिट करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी लोकमत ला दिली.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाने खुडेदच्या घोडीचापाडा येथे मंगल कार्यालय उभारण्या साठी निधी उपलब्ध करून दिला होता. हे मंगल कार्यालय शोधायचा प्रयत्न लोकांनी केला असता ज्या पाड्यात ही वास्तू उभारल्याचे दाखवण्यात आलंय त्या पाड्यातच नव्हे तर परिसरातील अन्य कोणत्याही पाड्यात असे मंगल कार्यालायच बांधण्यात आल्याचे त्यांना आढळून आले नाही. त्यामुळेच हे मंगल कार्यालय कुणी ‘चोरून’ तर नेले नाही ना? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता जे वास्तव समोर आले ते पाहून या विभागांतील अधिकारी भ्रष्टाचाराला किती चटावलेले आहे हेच समोर आले. आपल्या पाड्यात मंगल कार्यालय उभारण्यात आल्याचे दाखवून ९ लाख ९९ हजार ५३० रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाल्याची कुणकुण काही ग्रामस्थांना लागल्यानंतर त्यांनी याचा शोध घेतला. नंतर यासंबंधीची कागदपत्रे गोळा केली असता प्रत्यक्षात उभे न राहिलेल्या मंगल कार्यालयासाठी दोन्ही विभागाने सरपंचांंच्या संगनमताने १० लाखाचा निधी उकळल्याचे वास्तव समोर आले. त्यानुसार मग जव्हार प्रकल्पाधिकारी बाबासाहेब पारधे यांचेकडे तक्र ार करण्यात आलीत्यांनी गाव व पाड्यांना भेट दिली असता त्यांनाही तेथे मंगल कार्यालय अस्तित्वातचं नसल्याचे आढळून आले. त्यांनी तसा पंचनामा करून अहवाल सादर केल्याने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनीही या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.त्यामुळेच या मंगल कार्यालयाची ‘चोरी’ करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम व आदिवासी विभागातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कधी कारवाई होते या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. >न झालेल्या इमल्याचा अहवाल सादरसन २०१४-१५ मध्ये या मंगलकार्यालायच्या इमारतीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये हे काम सुरु झाले व ५ जानेवारी १६ मध्ये पूर्ण झाल्याचे कागदोपत्री अगदी बेमालुल पणे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर पुढे ज्या विभागाकडून यासाठी निधी उपलब्ध झाला. त्या जव्हारच्या आदिवासी विकास विभाग व ज्या विभागाने हे काम पुर्ण केले त्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ११ जानेवारी २०१६ रोजी संयुक्त पाहणी करून हे काम पूर्ण झाल्याचा अहवाल सादर केला आहे. खुडेद ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रदीप पाडवी यांनीही सदर मंगल कार्यालय पूर्ण झाले असून ग्रामपंचायतीची कुठल्याही प्रकारची हरकत नसल्याचा दाखला प्रकल्प अधिकारी यांना सादर करून ह्या बेकायदेशीर कामाला पाठिंबा देण्याचे काम केल्याचे दिसून आले आहे.फोटो शॉप चा बेमालूम वापरमंगल कार्यालयाच्या ‘चोरी’साठी साधे पुरावे देऊन भागणार नाही म्हणून या विभागाने मंगल कार्यालयाच्या वास्तूच्या कामाच्या पूर्ततेचा फलक बनवून एका वेगळ्याच इमारतीला मंगल कार्यालय म्हणून दाखविले आहे फोटोशॉपचा बेमालूम वापर करून बनावट वास्तूसह छायाचित्रही सादर केले आहे. या प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कपट, कारस्थान करून भलतीच इमारत मंगल कार्यालय म्हणून दाखविली व त्यासाठीचा १० लाखाचा निधी हडप करून त्याचे पद्धतशीर वाटपही केल्याचे समजते.