शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

वसईत काळ्या गुळाचा प्रचंड साठा जप्त

By admin | Published: July 30, 2015 12:29 AM

सरकारने कितीही निर्बंध टाकले तरी वसई-विरार उपप्रदेशात काळा गूळ व गुटखा यांची आवक सुरूच आहे. परराज्यांतून येणारा हा प्रतिबंधित माल रोखण्यासंदर्भात एक्साइज व

वसई : सरकारने कितीही निर्बंध टाकले तरी वसई-विरार उपप्रदेशात काळा गूळ व गुटखा यांची आवक सुरूच आहे. परराज्यांतून येणारा हा प्रतिबंधित माल रोखण्यासंदर्भात एक्साइज व पोलीस विभाग अपयशी ठरले आहेत. मंगळवारी वसई पश्चिमेस रानगाव परिसरात एका पथकाने काळ्या गुळाचा प्रचंड साठा जप्त केला. तलासरी येथे तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी होत असताना हा माल वसईपर्यंत पोहोचतो कसा, याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.वसई तालुक्याच्या ग्रामीण भागात अर्नाळा, रानगाव, अर्नाळा किल्ला, बोळिंज, आगाशी व अन्य गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या भट्ट्या लागत असतात. या दारूसाठी आवश्यक असलेला काळा गूळ पश्चिम महाराष्ट्र तसेच शेजारच्या गुजरात राज्यातून येत असतो. मध्यंतरी मुंबईच्या मालाड येथे झालेल्या दारूकांड घटनेनंतर पोलिसांनी निरनिराळ्या ठिकाणी धाडी टाकून गावठी दारू व साहित्य जप्त केले होते. त्यानंतर, काही काळ हे सर्व दारूचे अड्डे बंद झाले. कालांतराने पुन्हा ते जोमात सुरूही झाले. काल रानगाव मर्सीस परिसरात धाडी टाकून ७० पोत्यांत दडविलेला काळा गूळ पोलिसांनी जप्त केला. गुटखासेवनावरही बंदी असताना उपप्रदेशातील अनेक पानपट्ट्यांवर गुटखा सर्रास विकला जातो. (प्रतिनिधी)