पारोळ/वसई : स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, वसई कोळीवाडा येथील अल्पसंख्यांक विभागाच्या कार्यालयात या निमित्त एका कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉमनिक डिमेलो यांच्या हस्ते मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले , यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात डिमेलो यांनी जाती- धर्माच्या भिंती दूर करु न देशाच्या स्वातंत्र्यलढाई मध्ये तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये मौलाना आझाद यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले, यावेळी प्रदेश सचिव विजय पाटील, ग्रामीण अध्यक्ष राम पाटील, वासिम सय्यद, प्रवीणा चौधरी,किरण शिंदे,मिंगेल कोळी, सलीम खिमानी,रोहिणी कोचरेकर,श्रुती हटकर,मोहसिन शेख,निलेश पेंढारी, रफीक शेख,संदीप कनोजिया, सतीश म्हात्रे,अशरफ अली आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, सूत्रसंचालन स्टीवन क्र ेस्टो यांनी केले.(वार्ताहर)
वसई काँग्रेसच्या वतीने मौलाना आझाद जयंती
By admin | Published: November 15, 2016 4:09 AM