- आशिष राणेवसई : वसई - विरार शहर महानगरपालिकेचे विद्यमान महापौर रुपेश जाधव यांनी जुलै महिन्यात राजीनामा दिला होता. त्यानंतर ५ आॅगस्ट रोजी झालेल्या विशेष महासभेत हा राजीनामा मंजूर होऊन तो तातडीने विभागीय कोकण आयुक्त यांच्याकडे अग्रेशितही करण्यात आला होता. दरम्यान, कोकण आयुक्तांनी या प्रस्तावास मंजुरी देताना पालघर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नव्या महापौर निवडीसाठी लवकरच कार्यक्र म जाहीर करण्याच्या सूचना ही दिल्या होत्या. त्यानुसार पुढील शुक्र वारी, २३ आॅगस्ट रोजी ही महापौर निवडणूकवसई विरार महापालिका मुख्यालयात संपन्न होणार आहे.२३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता विरारच्या पालिका मुख्यालयात महापौर निवडणूक होणार आहे. यासाठी पालघर जिल्हाधिकारी निवडणुकीच्या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहतील. १९ आॅगस्ट रोजी महापौर पदासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल होणार आहेत, अशी माहिती पालिकेचे नगर सचिव संजीव पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.दरम्यान, मंगळवारी उशीरा राज्य शासनाने राज्यातील मुदत पूर्ण झालेल्या महानगरपालिकेच्या सर्व महापौर आणि उपमहापौरांच्या निवडणुकांना तीन महिने स्थगिती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्यामुळे या महापौर निवडणुकीबाबत पेच निर्माण झाला होता. या संदर्भात पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांना विचारले असता, त्यांनी हा निर्णय आॅगस्ट महिन्यात मुदत संपलेल्या महापालिकेच्या महापौर व उपमहापौरांबाबत असल्याचे स्पष्ट केले. वसई - विरार महापौर निवडणुकीची तांत्रिक बाब तपासल्यावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी हा महापौर निवडणूक कार्यक्र म घोषित केला.वसई-विरार शहर महापालिकेत सध्याचे महापौर पद हे सर्वसाधारण गटासाठी खुले असून जेमतेम आता हे पद वर्षभर भूषवता येईल. वसई विरार शहरात महापौर पदावर कुणाला संधी मिळणार, याबाबत तालुक्यात कमालीची उत्सुकता असून अर्थातच याचा निर्णय बविआचे सर्वेसर्वा आ. हितेंद्र ठाकूर घेणार यात शंका नाही.
वसई-विरार महानगरपालिकेची महापौर निवडणूक २३ आॅगस्टला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 1:43 AM