शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तारापूर प्रदूषण नियंत्रणासाठी बैैठक; पालकमंत्र्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:04 PM

मंत्रालयात घेतली तातडीची बैठक, दिले महत्वपूर्ण आदेश

पंकज राऊत बोईसर : राष्ट्रीय हरित लवादाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीत संपूर्ण देशात तारापूर प्रथम क्र मांकाचे प्रदूषणकारी औद्योगिक क्षेत्र असल्याचे जाहीर करताच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या दालनात मंगळवार (दि.२३) तातडीची बैठक घेऊन तारापूरचे प्रदूषण नियंत्रणात आणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनेक सूचना तर काही त्वरित आणि ठोस उपाय योजना करण्यासंदर्भात सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

या बैठकीला दहिसर (मुंबई) च्या आमदार मनीषाताई चौधरी, पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कैलास शिंदें, एमआयडीसीचे संतोष कारंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ठाणे व पालघर जिल्ह्याचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अंकुर राऊत, म.प्र.नि.मंडळ (सायन) श.च. कोलकर, एम.आय.डी.सी.चे सल्लागार (पर्यावरण), पी.पी.नांदुसेकर, एम.आय.डी.सी. तारापूरचे उपअभियंता, आर.जी.तोतला, तसेच म.प्र.नि. मंडळाच्या तारापूर एकचे उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर, तारापूर दोनचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी डॉ.अर्जुन जाधव, तारापूर येथील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे व्यवस्थापक जाधव तसेच भाजपा युवा मोर्चाचे तालुका युवा अध्यक्ष प्रणय म्हात्रे, नितीन राऊळ, जयेश घरत उपस्थित होते.

बैठकीत आ.चौधरी यांनी पालघरच्या समस्याबरोबरच तारापूरमधील प्रदूषणाबाबतचे भीषण वास्तव प्रखरपणे मांडले तर पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी, पालघर यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित यंत्रणांचे भरारी पथक स्थापन करण्याचे आदेश देऊन नवीन ५० एम.एल.डी. क्षमतेच्या सामूहिक सांडपाणी प्रक्रि या केंद्रापैकी प्रथम २५ एम.एल.डी. प्रकल्प लवकरात कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. तर एम.एस.ई.डी.ने सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी त्वरित विद्युत पुरवठा करण्याचे निर्देश देऊन सायंकाळी ६ ते सकाळी ७ वाजेपर्यंत तारापूर एम.आय.डी.सी.मध्ये रासायनिक टँकरला प्रवेश बंद करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले तर मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही लावून त्याचे मॉनिटरिंग करून कारखान्यातील बोअरवेलच्या पाणी वापरावर व ते वाहून नेणाºया टँकरवर बंदी घालण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी उपस्थित एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी एमआयडीसीमधील प्रेशर अ‍ॅण्ड नॅचरल गॅस वाहिनी टाकण्याचे काम पूर्ववत सुरू करण्यास सांगितले. मात्र ते काम पावसाळ्यानंतर सुरू केले जावे, अशी सूचना केली. तर एम.पी.सी.बी.च्या मापदंडाप्रमाणेच कारखान्यांनी रासायनिक सांडपाणी सोडावे असे आदेश दिले.