शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

स्मृती जव्हारच्या शाहीदरबाराच्या

By admin | Published: October 12, 2016 3:42 AM

भूतपूर्व संस्थानाची पार्श्वभूमी असलेल्या जव्हारच्या दरबारी आणि ऐतिहासिक दसऱ्याच्या आठवणी मंगळवारी जागविल्या गेल्यात दरवर्षीच्या उत्साहात यंदाही मोठया धामधूमीत

हुसेन मेमन / जव्हारभूतपूर्व संस्थानाची पार्श्वभूमी असलेल्या जव्हारच्या दरबारी आणि ऐतिहासिक दसऱ्याच्या आठवणी मंगळवारी जागविल्या गेल्यात दरवर्षीच्या उत्साहात यंदाही मोठया धामधूमीत दसरा साजरा झाला. त्याच्या संस्थानकालीन खुणा आजच्या जव्हारमध्ये थोडया प्रमाणात शिल्लक आहेत. त्यापैकी प्रामुख्याने उल्लेख कारावयाचा झाला तर या दरबारी दसऱ्याचा उल्लेख नक्कीच अभिमानाने करता येईल. काळाच्या ओघात सर्व संस्थाने खालसा झाली असली तरी गतस्मृतींना उजाळा देणारा उत्सव म्हणजे जव्हारचा दसरा. सुमारे सहाशे वर्षे परंपरेने चालत आलेला जव्हारचा दसरा ही जव्हारकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. अश्विन शुध्द प्रतिपदेस या उत्सवाचा प्रारंभ होत असे. नवमीचा होम झाल्यानंतर पूर्णाहुतीच्या वेळी देवीची ओटी भरली जात असे, त्यानंतर देवीस महिषासुराचा प्रतिक असणाऱ्या रेड्याचा बळी दिला जात असे. नवमीच्या दिवशी विजया दशमीच्या उत्सवाच्या तयारीस प्रारंभ होत असे भल्या पहाटे जुन्या राजवाडयातील नगारखाने सनई चौघडयांनी दुमदुमून जात. घराण्यातील व्यक्तींकडून पूजा अर्चना त्यांचप्रमाणे शस्त्रपूजा, अश्वपूजा, वाहनपूजा केली जात असे. घोडे, उंट व हत्ती यांना स्रानासाठी जव्हारजवळील जामसर येथील तळयावर नेले जात असे. सर्व विधी उरकल्यानंतर सायंकाळी दसरा मिरवणूकीस सुरूवात होत असे. राजे घोडयांच्या बग्गीत स्थानापन्न होत असत दिमाखात मिरवणूकीस प्रारंभ होत असे. दरबारी पोशाखात पाठीला ढाल व कमरेस तलवार घेऊन सर्व सरदार मंडळी, नागरिक मोठया संख्येने सहभागी होत असत. ही मिरवणूक हनुमान पॉईटवर जात असे. तेथे शमी पूजनाचा कार्यक्रम साजरा होत असे. मुलुखगिरीला दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरूवात करण्याचे प्रतिक म्हणून आठही दिशांना बाण सोडले जात. तेथे मारूतीचे दर्शन घेऊन तेथे नवीन ध्वज चढविला जात असे. त्यानंतर पुन्हा मिरवणूक परतत असे.