शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

मेट्रो वसई-विरार पर्यंत, सीएमचा आचारसंहिताभंग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 6:19 AM

मीराभार्इंदर पर्यंत येत असलेली मेट्रो वसई-विरार पर्यंत आणण्याचे अप्रत्यक्ष आश्वासनच वसईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेला बगल देत बेधड़क देऊन टाकले.

पारोळ - मीराभार्इंदर पर्यंत येत असलेली मेट्रो वसई-विरार पर्यंत आणण्याचे अप्रत्यक्ष आश्वासनच वसईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेला बगल देत बेधड़क देऊन टाकले. लोकलच्या प्रवासासाठी वसईकरांना त्रास सहन करावा लागत असल्याने मीराभार्इंदरपर्यंत मेट्रो येणार असल्याचे सांगून ते क्षणभर थांबले. उपस्थितांना उद्देशुन म्हणाले, तुमच्या मनातले मी जाणले आहे. आता तुम्हीही माझ्या मनातले समजून घ्या, अशा मार्मिक शैलीत मुख्यमंत्र्यांनी आगामी काळात विरार पर्यंत मेट्रो धावणार असल्याचे संकेत शनिवारी वसईत दिले.वसईतील एसटीची शहर बससेवा शिवसेनेच्या मंत्र्यांनी बंद केल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचे प्रतिज्ञापत्र उच्चन्यायालयात शासनाने सादर केल्याचे सांगून वसईचा हरितपट्टा कायम ठेवणार असल्याचे महत्त्वपूर्ण आश्र्वासन देऊन, येथील जनतेस स्वतंत्र नगरपरिषद वा ग्रामपंचायत हवी असेल तर तसा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना आता दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूचे भांडवल करत आहे. त्यांच्या मुलाला फितवलं गेलं आहे. त्यांचे वनगा कुटुंबियांवरचे प्रेम बेगडी आहे. वनगा कुटुंबीय आमचेच आहे उद्या मातोश्रीची दारे बंद झाल्यावर श्रीनिवास आमच्याकडेच येणार. त्याला आमची दारे तेंव्हाही उघडी असतील, असे सांगितले. येथील कायदा सुवव्यस्था भक्कम करण्यासाठी पोलीस आयुक्तालय घोषीत केले असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस