वसई : विरार पश्चिमेकडील म्हाडा वसाहत येथे सुरक्षा रक्षक म्हणून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या पुरु ष व महिला कर्मचाºयांचे मासिक वेतन त्यांचे कंत्राटदार तसेच उपकंत्राटदार यांनी थकवले आहे. या प्रकरणी कंत्राटदाराच्या गैरकारभाराबद्दल चौकशी करण्यात यावी व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना नालासोपारा विधानसभा समन्वयक प्राची फणसे यांनी केली आहे.
म्हाडा वसाहत येथे सुरक्षा रक्षक म्हणून कंत्राटी पद्धतीवर काम करणा-या कर्मचाºयांचे मासिक वेतन कंत्राटदार देत नसल्यामुळे हे कर्मचारी हतबल झाले आहेत. अनेकदा या कर्मचा-यांना शिवीगाळ व मारहाण केली जाते. याबाबत त्यांनी नालासोपारा विधानसभा समन्वयक प्राची फणसे यांची भेट घेऊन याबाबत मध्यस्थी करून गरीब कर्मचा-यांचे वेतन मिळवण्यास मदत करावी म्हणून विनंती केली. त्यानुसार म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. आमदार सामंत यांनी याबाबत येत्या ७ दिवसात तपास करुन त्याची माहिती देण्याचे तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन यांनी दिले.