नवी मुंबई : राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानामध्ये तीन वेळा पुरस्कार मिळविणाऱ्या नवी मुंबईमध्ये अद्याप पुरेशी स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. महिलांसाठी एकही मोफत स्वच्छतागृह नाही. ही गैरसोय दूर करण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आमदार निधीतून शहरात ३० स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई हे सुनियोजीत शहर म्हणून ओळखले जाते. महापालिकेला राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र नागरिकांना आजही रस्त्यावर जावे लागते. नवी मुंबईमध्ये आमदार निधीतून २ कोटी रुपये खर्च करून ३० स्वच्छतागृहे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्याधुनीक पद्धतीने व नागरिकांच्या गरजेच्या ठिकाणी ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
३० स्वच्छतागृहांसाठी म्हात्रेंचा आमदार निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2015 3:06 AM