जव्हार : कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागातील आरोग्य, पाणी, कुपोषणाच्या समस्यावर ठोस उपाय योजना होत नसल्याचे परिणाम आदिवासी बहुल गाव-पाड्यातील लोकांवर होत असल्याने शेकडो महिलांनी जव्हारच्या जनसुनावणीमध्ये आपला संताप व्यक्त केला.आरोग्य देखरेख व नियोजन समिती, जव्हारच्यावतीने बुधवारी जव्हारच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये जनसूनावणी कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. २००७ पासून ह्या जनसूनावणीचे आयोजन करण्यात येत असून आपल्या भागात शासकीय यंत्रणे कडून होणारा अन्याय, दुजाभाव, अपमान आदी समस्याचे निराकरण शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येते. या जनसूनावणीचे प्रमुख म्हणून लोकमतचे पालघर प्रतिनिधी हितेन नाईक यांना समितीने आमंत्रित केले होते. यावेळी कॉटेज हॉस्पिटल चे अधीक्षक डॉ. रामदास मराड, पंचायत समिती सदस्य मनोज गावंडा, बालविकास प्रकल्पधिकारी रामेश्वर मुंडे, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, समिती सचिव शिवाजी गोडे, डॉ.किरण पाटील सह पाणीपुरवठा, बालविकास आदी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.जव्हारच्या कॉटेज हॉस्पिटल बाबतच्या तक्र ारी या जनसूनावणीमध्ये उपस्थितांनी केल्या. या संदर्भात अधीक्षक डॉ. मराड यांनी या तक्र ारीत तथ्यता असल्याचे मान्य करून नर्स स्टाफच्या इंचार्ज गायकवाड ह्यांना बोलावून पुरेसे लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. नवीन बिल्डिंगमध्ये असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगून प्रत्येक माळ्यावर स्वतंत्र निर्संग स्टाफ नियुक्त करण्यात येईल, बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्यात आले असून उशिराने येणाºयांना वेतन कपातीच्या शिक्षेला सामोरे जावे लागेल असा इशारा डॉ. मराड ह्यांनी दिला. औषधाबाबत हॉस्पिटलमध्ये येणाºया रु ग्णाची मोठी संख्या असल्याने कधीकधी औषधांचा तुटवडा भासत असल्याचे त्यांनी सांगितले.रुग्णांना मिळते हीन वागणूक; औषधांसाठी पदरमोड- जव्हार, विक्र मगड तालुक्यातील आरोग्य सेवेसह उपचार, रु ग्णांना मिळणारी हीन वागणूक आदी बाबत उपस्थित महिलानी अनेक प्रश्न उपस्थित केले. साकुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रु ग्णांना हीन वागणूक देत बाहेरून औषधे आणण्याची सक्ती केली जाते.वैद्यकीय अधिकारी रु ग्णालयात वेळेवर न येणे आदी मुद्द्याबाबत तक्र ारी देऊ केल्या. या वास्तवदर्शी प्रश्नांमुळे वैद्यकीय अधिकाºयांविरोधात खूप तक्र ारी असून वरिष्ठांना कळविल्याची माहिती तालुका वैद्यकीय कार्यालयाकडून आलेल्या डॉ.पाटील ह्यांनी सांगितले.
कोट्यवधींचा चुराडा तरी समस्या तशाच, जनसुनावणीत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:53 AM