शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

विकास आराखड्यातील बदलास राज्यमंत्र्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:56 PM

पालघर जिल्ह्याच्या आशा पल्लवित; जनतेने सोडला सुटकेचा नि:श्वास, असंख्य त्रुटी, प्रचंड दोष पाहून मंत्रीही चकित

- हितेन नाईक पालघर : पालघर, ठाणे, रायगड प्रादेशिक आराखड्यामधील त्रुटी, दोष हे जिल्ह्यातील स्थानिकावर अन्यायकारक असून सादर केलेल्या आराखड्यात सुचिवलेल्या बाबीवर सकारात्मक विचार करून बदल न केल्यास जिल्ह्याच्या विकासाला पुढील २० वर्षांपर्यंत मोठी खीळ बसणार असल्याचे वास्तव स्थानिकांनी रायगडचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांना उदाहरणांसह दाखवून दिले.पालघर जिल्हा आर्किटेक्ट, इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र काळे, वास्तू शिल्प असोसिएट्सचे मालक निशांत पाटील, इप्सित ग्रुपचे एमडी प्रसन्न गडकरी तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष. प्रशांत पाटील,प्रदेश सचिव युवा नेते. अंकुर राऊत, युवा जिल्हा सरचिटणीस. समीर पाटील,पालघर शहर अध्यक्ष. जयेश आव्हाड, युवा अध्यक्ष हर्षद पाटील ह्यांनी १९ जून रोजी राज्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जिल्ह्यात पुढील काळात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, अल्पभूधारक, बिल्डर आदींवर होणारा अन्याय चव्हाणांच्या निदर्शनास आणून दिला.प्रसिद्ध झालेल्या आराखड्यांतर्गत नकाशामध्ये अस्तित्वातील जमीन वापर नकाशे सदोष असून एन ए करण्यात आलेल्या जमिनी हरितपट्ट्यात (ग्रीन झोन) मध्ये टाकण्यात आलेल्या आहेत. पालघरचा भौगोलिक विचार न करता केलेला हा नकाशा असून जिल्ह्याच्या भविष्याचा वेध घेणारा हा आराखडा असल्याने त्याचा अभ्यासपूर्वक विचार करून संबंधित तज्ञांच्या मदतीने तो साकारणे गरजेचे असताना तसे काही झाल्याचे दिसून येत नाही. पालघर अणुशक्ती केंद्रासंदर्भात काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास जी आपत्कालीन व्यवस्था करावी लागणार आहे त्याबद्दल कोणत्याही प्रकारची उपाययोजना या आराखड्यामध्ये करण्यात आल्याचे दिसून येत नाही, आपत्कालीन व्यवस्थापन हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असून ते स्वत: या प्रादेशिक योजनेच्या समितीचे उपाध्यक्ष आहेत. इतक्या गंभीर विषयाची पायमल्ली करून नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा जीवघेणा प्रकार असल्याची भावना स्थानिका मधून व्यक्त केली जात आहे. शासनाने नवीन शर्ती व इतर जमिनींना परवानग्या देतांना जमीन मालकाकडून मोठ्या रक्कमा वसूल केल्या असतांना त्या जमिनी आता ग्रीन झोनमध्ये अंतर्भूत केल्या आहेत. हा प्रकार म्हणजे दुहेरी आर्थिक लूट असल्याची संतप्त प्रतिक्रीया जिल्ह्यात उमटू लागल्या आहेत. शेतकरी-बागायतदार ह्यांना आपल्या जमिनीत शेतघर बांधण्याची परवानगी मिळणार असली तरी परवानगीसाठी मात्र जिल्हाधिकाºयाकडे जावे लागणार असून ग्रामपंचायतीना फक्त बांधकाम परवानगी देण्याइतपतच मर्यादित अधिकार राहणार असून साधे शेतघर बांधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. त्यासाठी मोठ्या रक्कमेचा नजराणाही भरावा लागणार आहे. तर दुसरीकडे केळवे, डहाणू, बोर्डी आदी पर्यटन ठिकाणी बांधण्यात आलेल्या बांधकामांना बेकायदेशीर ठरवून ते तोडण्याच्या नोटीसा प्रांत कार्यालयाकडून गेल्याने जिल्ह्याचा पर्यटन व्यवसाय धोक्यात येणार आहे. आदी अनेक त्रुट्या शिष्टमंडळाने राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या