मीरा-भार्इंदरच्या मतदार यादीत यंदाही घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:37 AM2018-11-01T00:37:40+5:302018-11-01T00:37:59+5:30
निवडणूक आयोगाने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांपैकी मीरा-भार्इंदर मतदारसंघ १४५ मधील याद्यांत मोठ्या प्रमाणात घोळ असून त्यात तब्बल १० हजार ५५८ मतदारांची नावे दोनवेळा नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
भार्इंदर : निवडणूक आयोगाने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांपैकी मीरा-भार्इंदर मतदारसंघ १४५ मधील याद्यांत मोठ्या प्रमाणात घोळ असून त्यात तब्बल १० हजार ५५८ मतदारांची नावे दोनवेळा नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या घोळावर मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने आक्षेप घेतला असून, घोळ सुधारण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
मतदार नोंदणीत यंदाही घोळ झाल्याचे आरोप होत असून, त्यामुळे आगामी निवडणुकांत मोठ्याप्रमाणात बोगस मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या एकट्या मीरा-भार्इंदर मतदारसंघातच १० हजार ५८८ मतदारांची नावे दोनवेळा नोंदविण्यात आली आहेत. अनेक मतदारांची केवळ नावेच नोंदविण्यात आली असून, त्यांचे पत्ते मतदार याद्यांतून गायब करण्यात आले आहेत. अनेक मतदारांच्या नावांपुढे त्यांचे छायाचित्रच प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी निवडणूक कर्मचाºयांना त्यांची ओळख पटवणे शक्य होणार नाही. एकाच इमारतीतील मतदारांना वेगवेगळ्या याद्यांत विभागण्यात आल्याने अधिकृत मतदारांच्या नावांचा गैरफायदा बोगस मतदानासाठी होण्याची शक्यता असल्याचा आरोप काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी केला. या घोळामुळे बोगस मतदानाला चालना देण्याचे काम सत्ताधाºयांच्या दबावाखाली तर होत नाही ना, असा आरोपही सावंत यांनी केला. गेल्या पालिका निवडणुकीतही सुमारे १० हजारांहून अधिक बोगस नावे नोंदविण्यात आली होती.
भाजपा काळात घोळ
ही नावे काँग्रेसनेच शोधून अधिकाºयांना वगळायला लावली होती. भाजपाच्या सत्तेतच असे घोळ झाल्याचा आरोप सावंत यांनी केला.
या घोळयुक्त याद्यांवर काँग्रेस कमिटीने आक्षेप घेत, ती सुधारण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी भोईर यांना दिली.