पालघर - माहीमच्या रांजणपाडा येथील तलावात गुरुवारी सायंकाळी एक फ्लेमिंगो पक्षी पतंग उडविण्याच्या मांजामध्ये अडकल्याने रक्त बंबाळ अवस्थेत स्थानिकांना सापडला. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून वनविभाग अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला मुंबई येथील वनविभागाच्या रु ग्णालयात पाठविण्यात आले आहे.माहीम, केळवे या भागात असलेली मिठागरे, खाडी-खाजणे हा भाग फ्लेमिंगो, किंगफिशर, सिगल आदी पक्षांचे आवडीचे ठिकाण असून प्रत्येक वर्षी पावसाळ्यातआणि थंडीत शेकडोच्या संख्येने फ्लेमिंगो सायबेरियातून हजारो मैलाचे अंतर कापून थव्याने या भागात येत असतात.एकांतवास आणि प्लवंग, सूक्ष्म जीव, शिंपले, लहान जवला, कोळंबी अशा खाद्यांची विपुलता या भागात असल्याने त्यांचे हे आवडीचे ठिकाण बनले आहे. या पक्षांना पाहण्यासाठी आणि त्याची छायाचित्रे टिपण्यासाठी विविध भागातून पक्षीप्रेमी, छायाचित्रकार मोठ्या संख्येने येत असतात.ख्रिसमसची सुट्टी आणि संक्र ांत जवळ आल्याने आकाशात पतंग उडविण्याच्या स्पर्धा सुरू झाल्या असून बंदी घालण्यात आलेला चायनीज मांजाचा वापर करण्यात येत आहे. गुरु वारी संध्याकाळी आकाशातून उडत चाललेला एक फ्लेमिंगो पक्षी पतंगाला लावलेल्या चायनीज मांज्यात अडकला.पंखाला जबर जखम झाल्याने तो घिरट्या घालीत माहीमच्या बीएसएनएल इमारतींच्या मागील भागात असलेल्या रांजण पाड्यातील एक तलावात कोसळला होता.स्थनिक तरुणांचे प्रयत्न; वनविभागाचे सहकार्यस्थानिक तरु णांनी त्याला पकडले. माहीम येथील निलेश म्हात्रे यांनी तात्काळ पर्यावरण प्रेमी प्रो. भूषण भोईर यांना याबाबत कळविले.भोईर यांनी आपले मित्र आनंद पाटील, यश यांच्या सहाय्याने फ्लेमिंगोला ताब्यात घेत प्रथम माहीम पोलीस चौकीत आणले. वन विभागाचे डीएफओ भिसे यांच्याशी संपर्क साधल्या नंतर त्यांनी माहीमच्या स्थानिक कर्मचाºयांना पाचारण केले.फ्लेमिंगो अति संरक्षित पक्षांच्या यादीमध्ये मोडत असून त्यास खाद्य देणे खूप जिकिरीचे असल्याने भुके अभावी त्याच्या जीवितास धोका पोहचू नये म्हणून त्याला मुंबईच्या वनविभागाच्या रु ग्णालयात पाठविण्यात आले आहे.पक्षाच्या जीवाला धोका पोचिवणार्या चायनीज मांज्याला बंदी असतानाही त्याची सर्रास विक्र ी सुरू असल्याने संबंधित विभागाने यावर कारवाई करावी.- प्रा.भूषण भोईर. पर्यावरण प्रेमी
पतंगाच्या मांजाने फ्लेमिंगो रक्तबंबाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 2:28 AM