डहाणू : प्रस्तावित वाढवण बंदराच्या विरोधातील आंदाेलनाची धार तीव्र होत असून नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आता या आंदोलनाला विविध संघटना पाठिंबा देत असतानाच राजकीय पक्षांनीही या आंदोलनातउडी घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.डहाणू विधानसभा मतदारसंघाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. विनोद निकोले आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांनी वाढवण बंदराला विरोध दर्शवला आहे. या आंदोलनाला बळकटी देण्याची भूमिका घेत हे आमदार येत्या हिवाळी अधिवेशनात वाढवण बंदरविरोधी भूमिका मांडणार आहेत. शनिवारी डहाणूच्या शासकीय विश्रामगृहावर बंदरविरोधी काही कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला डहाणूचे आमदार कॉ. विनोद निकोले, राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा यांनी या बैठकीला उपस्थिती लावली.
श्रीनिवास वनगा यांचाही विराेध पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांना याविषयी विचारले असता त्यांनीहीबंदरविरोधात आपण स्थानिकांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाढवण बंदराला आता सर्वच थरातून विरोध होत असतानाच जिल्ह्यातील सर्वच आमदार वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे वाढवण बंदरविरोधी समितीला राजकीय बळ प्राप्त झाले आहे. बंदर रद्द करण्यास भाग पाडूवाढवण बंदर हे स्थानिकांच्या मुळावर येणार प्रकल्प आहे. आंदाेलन करून बंदर रद्द करण्यास केंद्र सरकारला भाग पाडू, असा इशारा आमदार निकाेले यांनी यावेळी दिला. आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा कीर्ती मेहता, युवक जिल्हाध्यक्ष वरुण पारेख, नगरसेवक तन्मय बारी आदी या बैठकीला हाेते.