पालघर : या शहरातील प्रचंड वाहतूककोंडी, फेरीवाल्यामुळे सर्वसामान्य जनतेस होणाºया त्रासाला सर्वस्वी नगरपरिषदेचे ढिम्म प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करुन मनसेने मंगळवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घुसून निषेध व्यक्त केला आणि ठिय्या आंदोलन छेडले.रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांना प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असून त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व मुख्य रस्त्यावर बसणाºया अनधिकृत फेरीवाल्यांमुळेही सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास होत असून, नागरिकांना चालणेही कठीण होऊन बसले आहे. त्यातच रोज होणाºया वाहतूककोंडीचे फेरीवाले हेच मुख्य कारण असून संबंधित अधिकारी यावर कुठलिही उपाययोजना करीत नसल्यामुळे सर्व सामान्या मधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. शहरात फेरीवाला धोरण आखले जात नसल्याने रस्त्यावर कुठेही बसणाºया या फेरीवाल्या मध्ये शिस्तच राहिलेली नसून, काही लोक स्वत:च्या स्वार्थापोटी तसेच मिळणाºया बाजारकरापोटी संबधीत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास तयार होत नाहीत.२० वर्षांतील विकासाचा लेखाजोखा मांडा-पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून देखील शहरातील प्रमुख रस्त्यापैकी एकही रस्त्यावर साधे शौचालय नसल्याची लाजिरवाणी बाब प्रकर्षाने जाणवत असून महिलांची मोठी कुचंबणा निर्माण होत आहे. या वेळी नगरपरिषदेने वीस वर्षात काय विकास कामे केली याचा लेखाजोखा जनते समोर मांडण्याची मागणी केली गेली.मुख्याधिकाºयांनी फेरीवाल्यांवर कारवाई करून, हटवावे व दिलासा द्यावा. अन्यथा, मनसे कुठल्याही क्षणी उग्र आंदोलन करेल असा इशारा माजी जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे, अनंत दळवी, तालुकाध्यक्ष समीर मोरे यांनी दिला.
फेरीवाले हटावसाठी मनसे आक्रमक, पालघर पालिकेची सभा हादरली : उग्र आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:07 AM