वसई : महापालिकेच्या वालीव येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे हाल होत असल्यामुळे मंगळवारी दुपारी मनसेने राडा केला होता. तसेच आयुक्तांनाही शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी विरार पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याचा ठपका ठेवून विविध कलमांसह बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव याप्रकरणी आपले पदाधिकारी वितेंद्र पाटील, जयेंद्र किसन पाटील, प्रवीण राऊत आणि इतर कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी आयुक्त गंगाथरन डी. यांना भेटण्यासाठी मुख्यालयात गेले होते. मात्र, फक्त दोनच कार्यकर्त्यांना आपल्या दालनात पाठवण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यामुळे जाधव आक्र मक झाले होते. त्यांनी कोविड सेंटरमधील हेळसांड कारभाराचे फोटो आयुक्तांच्या दरवाजावर चिकटवले. त्यानंतर आयुक्तांना उद्देशून शिवीगाळ करून निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली. कोविड सेंटरमध्ये सुधारणा झालीच पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली होती. जाधव यांच्या आक्र मक पवित्र्यामुळे मुख्यालयातील वातावरण काहीवेळ तंग झाले होते. यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत विरार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रवीण साहेबराव निकम यांनी तक्र ार देऊन मनसेच्या अविनाश जाधव, वितेंद्र पाटील, जयेंद्र किसन पाटील, प्रवीण राऊत आणि इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
मनसेचे अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:04 AM