पारोळ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा मंगळवार, १ मे रोजी महाराष्टÑ दिनी वसईतील चिमाजी आप्पा मैदानावर होणार असून या सभेसाठी मनसे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यांच्या महराष्ट्र दौऱ्याची ही सुरुवात असल्याने ते कुणावर निशाणा साधणार आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.ठाकरे यांनी वसई तालुक्यातील राजावली, वाघ्रालपाडा येथील जमिनीवरील अवैध बांधकामांची पोल खोल केल्यानंतर वसईतील मनसे कार्यकर्त्यांनी ही बांधकाम तोडण्यात यावीत या साठी तहसील कार्यालयावर आंदोलन केले याते या १२ कार्यकर्त्यांवर गुन्हे ही नोदवण्यात आले होते. हे प्रकरण मनसे ने उचलून धरल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने महसूल विभाग, वनविभाग, पालघर पोलीस, वसई विरार शहर महापालिका यांनी संयुक्तपणे कारवाई करत वन जमीनीवरील अवैध बांधकामे पाडण्यात आली होती. या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांना वेठीस धरणाºया महसूल विभाग, वनविभाग, पालघर पोलीसांवर राज ठाकरे हे समाचार घेणार का की, वसईतील सत्ताधाºयांवर नेम धरणार या कडे जनतेचे लक्ष लागले आहे.
वसईतील सभेसाठी मनसेची मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:22 AM