मनोर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झंजावाती दौºयाला पालघर जिल्ह्यातून सुरुवात झाली असतानाच बुधवारी मनसेला जिल्ह्याचे उपाध्यक्षांसह पंधरा पदाधिकाºयांनी रामराम ठोकला. वाडा येथे पक्षाच्या अध्यक्षांकडे हे राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत.हे राजिनामे म्हणजे पक्षाला हादरा असून यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. वरिष्ठाकडून होणारे दुर्लक्ष व गलिच्छ राजकारण त्यास कर्णिभूत असल्याचे यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष आशिष मेस्त्री यांनी सांगितले. त्यांची दिलेल्या राजिनामा पत्रात आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, गेल्या महिनेभरातील घडामोडी, केलेले लॉबिंग, प्रामाणिक पदधिकाºयांना बाजूला सारण्याची अप्रामाणिक पणाचा इतिहास असणाºयांना पैशाच्या बळावर व्यासपीठ व मानसन्मान देण्याची खेळलेली धूर्त खेळी या घडामोडी पहाताना व पैसा हा एकमेव निकष ठेऊन पक्षात पदे व मानसन्मान मिळत असेल तर प्रामाणिक कार्यकर्ते व पधिकार्यांनी काय करावे अशी खंत व घुसमट त्यांनी व्यक्त केली आहे.शिरीष सावंत, सचिन मोरे, अविनाश जाधव, राजन गावंड यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून मी माझ्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी राजिनाम्यात म्हंटले आहे. तर मेस्त्री म्हणाले की, जो व्यक्ती पक्षाशी बेइमानी करतो, कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही अशा संखेला पुन्हा पद मिळत असेल तर आम्हाला पक्षात राहण्यात स्वारस्य नाही.
पंधरा पदाधिकाऱ्यांचा मनसेला रामराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 2:13 AM