तलवाडा/विक्रमगड : पारंपरिक शेती व्यवसाय बदलून आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती फायदेशीर ठरेल. शासनानेही शेतकऱ्यांकरिता अनेक योजना आणल्या आहेत़ पण त्याचा योग्यरीत्या फायदा विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांना पाहिजे, त्या प्रमाणात होऊ शकला नसल्याने येथील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत़ ते आपली पारंपरिक शेतीच करीत आहेत़येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीची वाट न बघता शेतीचे स्वरूप बदलावे, असे आवाहन तज्ज्ञ शेतकरी मंडळीकडून करण्यात येत आहे़ आज फुलशेतीला, हळदशेतीला, मत्स्य शेतीलासुद्धा येथे चांगला वाव आहे़ या प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी फुलशेती, मत्स्यशेती, हळदलागवड केली जात आहे़ फुलशेती केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन अर्थलाभ चांगला मिळू शकतो, तर पावसाच्या भरवशावर चार महिन्यांमध्ये विविध भाताच्या वाणांची आधुनिक दृष्टीने लागवड व शेती केल्यास चांगले उत्पन्न व खर्च कमी होण्याच्या दिशेने आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पाऊल उचलण्यास हवे़ शेतीमध्ये दोनचार वर्षांत आधुनिक शेतीचे रूप विक्रमगड व तालुक्यातून बघावयास मिळणार आहे. या पद्धतीत खताच्या वापरात ४० टक्के कपात होऊन उत्पन्न घेणे शक्य होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते़कृषी विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या चारसूत्री लागवडीने ग्रामीण भागातील शेती पद्धतीत बदल होऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकेल, अशी अपेक्षा कृषी विभाग प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे़ विक्रमगड तालुक्यातील ८६ गावपाड्यांतून ७८८७ हेक्टर व कंपन्यांनी तयार केलेल्या सुधारित भातांच्या विविध वाणांची लागवड केली आहे़ आता शेतकरी जुनाट वाणांची लागवड न करता सुधारित वाणांची लागवड करून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत़ परंतु, विक्रमगड तालुक्याच्या भातलागवडीचे क्षेत्र वाढण्याऐवजी घटत चाललेले आहे.
शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब व्हावा
By admin | Published: July 11, 2016 1:41 AM