शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत - जिग्नेश मेवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 5:02 AM

मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. नाटके करण्यात हुशार असल्याने ते खरे ‘नटसम्राट’ आहेत. भाजपा सरकार गरिबांचा नाही, तर अंबानी-अदानींसारख्या बड्या उद्योजकांचा विकास करीत आहे.

वसई : मोदी देशात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. नाटके करण्यात हुशार असल्याने ते खरे ‘नटसम्राट’ आहेत. भाजपा सरकार गरिबांचा नाही, तर अंबानी-अदानींसारख्या बड्या उद्योजकांचा विकास करीत आहे. बुलेट ट्रेनच्या नावाखाली वसईतील हरितपट्टा नष्ट करण्याचे धोरण सरकारने अवलंबिले असल्याची टीका गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केली.वसईमध्ये नव्याने विकसित होणाऱ्या बुलेट ट्रेन व मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या विकास आराखड्याच्या प्रकल्पाला हजारो ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या प्रकल्पाविरोधात वसई पर्यावरण समिती व ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मेवाणी येथे आले होते. या वेळी भूमीसेना संस्थापक काळूराम धोदडे, फा. फ्रान्सिस दिब्रिटो, नगररचनाकार चंद्रशेखरप्रभू आदी उपस्थित होते.एमएमआरडीएने मुंबईसह वसई-विरार, भार्इंदर, ठाणे, पनवेल, रायगड, उरण, अलिबाग या महानगर प्राधिकरण क्षेत्रासाठी २०१६ ते २०३६ असा २० वर्षांसाठीचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. मात्र, हा आराखडा शेतकरी व भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा असल्याने त्याला विरोध झाला आहे. वसई विरारमधून या आराखड्या विरोधात ३५ हजारांहून अधिक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.बुलेट ट्रेनलाही विरोधतसेच बुलेट ट्रेन प्रकल्पालादेखील येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. बुलेट ट्रेनसारखा प्रकल्प वसई-विरारवासीयांच्या फायद्याचा नसतानाही स्थानिकांना उध्वस्त करण्याचा डाव प्रशासनाने आखला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विकासाच्या नावाखाली वसईतून कोस्टल कॉरीडोर रोड, बुलेट ट्रेन, रेल्वे कॉरीडोर, औद्योगिक क्षेत्र, असे प्रकल्प राबविले जाणार असल्याने येथील शेतकरी, मच्छीमारबांधव व भूमिपुत्र उद्धवस्त होणार असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीVasai Virarवसई विरार