जव्हार : रविवारी मोहंरमचा दहावा दिवस म्हणजे आशुराचा दिवस मुस्लिम धर्मियात मोठ्या मानाचा दिवस मानला जातो, या दिवशी इमाम हुसैन (र.अ.) व त्यांचे कुटुंब इस्लामसाठी शहीद झाले या निमित्ताने गेल्या दहा दिवसांपासून ठिक ठिकाणी छबील बांधून त्यांची आठवण ठेऊन दररोज हजारो लिटर दुधाचे, सरबताचे वाटप व प्रवचनाचे कार्यक्रम करण्यात आले होते.तसेच बाळगोपाळांनी सुध्दा मोहरमनिमित्त छोटेसे छबील बांधून पिण्याचे पाणी व दररोज सायंकाळी सरबताचे वाटप केले.आज दहाव्या दिवशी शहीदांना आदरांजली म्हणून नमाजचे पठण जामा मस्जिद येथे करण्यात येऊन त्यांच्या कुर्बानीचे स्मरण करण्यात आले. तसेच आजचा शेवटचा दिवस म्हणून ठिकठिकाणी दूध कोल्ड्रींक्सचे वाटप करण्यात आल. हक हुसैन, या हुसैन अशा घोषणा देण्यात आल्या.यावर्षीही मोहरंम मध्ये इमाम हुसैन (र.अ.) यांच्या बलिदान निमित्ताने शहरात ठिकठिकाणी महेफिल मनविली गेली. यामध्ये घडलेले प्रसंग व त्यांना वीरमरण मिळून ते कसे शहीद झाले यावर प्रवचन करण्यात आले. यावेळी समाजबांधवांनी हा कार्यक्रम अत्यंत शिस्तपद्धतीने व शांततेत पार पाडला. या कार्यक्रमात सर्वच समाजाचे बंधू आणि भगिनी सहभागी झाल्या होत्या.
मोहरम सर्वत्र उत्साहात, ताबूत, ताजिया यांच्याही ठिकठिकाणी मिरवणूका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:17 AM