विरार : व्हिजन ह्युमॅनिझम एनजीओ विरारद्वारा आयोजित तिसरी ५ कि.मी. व १० कि.मी. मान्सून मॅरेथॉन स्पर्धा २१ जुलै २०१९ रोजी शानदार दिमाखात क्लब वन येथे पार पडली. ५ कि.मी.साठी १३७ व १० कि.मी. साठी ९१ स्पर्धकांनी सहभाग घेतला. आयर्न मॅन हार्दिक पाटील यांचा सहभाग हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण होते. स्पर्धेला लखोजी टोयाटो यांचे प्रायोजकत्व तसेच माध्यम प्रायोजक लोकमत होते.विविध गटातील प्रमुख तीन अशा एकूण ३६ विजेत्यांना डीवाय.एस.पी. (विरार) रेणुका बागडे तसेच स्थानिक नगरसेविका वासंती पाटील, लोकमतचे पालघर जिल्हा प्रमुख हारून शेख, लखोजी टोयाटोचे प्रमुख व्यवस्थापक अमर पवार आणि सीईओ नवशाद अली, क्लब वनचे अधिकारी सुभाष बहेरा यांचे हस्ते ट्रॉफी आणि रोख पारितोषिक धनादेश वितरण करण्यात आले. व्हिजन ह्युमॅनिझमचे संस्थापक अध्यक्ष आशुतोष गहिवाल यांनी सर्व स्पर्धक, प्रायोजक, आयोजक व प्रमुख पाहुणे यांचे विशेष आभार मानले.
व्हिजन ह्युमॅनिझम ही संस्था २०१४ पासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असून विविध उपक्रम राबवत आहेत. त्यात मुलांना मोफत संगणक शिक्षण देणे, रक्तदान शिबिर घेणे, ते रक्त गरजूंपर्यंत पोहचविणे आणि आदिवासी भागात व्हिजन किसान उपक्रम राबवून शासनाच्या डिजिटल इंडिया बनवण्याच्या भूमिकेला अनुसरून प्रगतीचे पाऊल पुढे पडते आहे. या मॅरेथॉनद्वारा देखील सर्व युवक, युवती, वृद्ध यांचे आरोग्य सदृढ राहावे, यासाठी प्रयत्नशील राहणारी ही संस्था भविष्यात असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी बांधील आहे.
१० किलोमीटर (१६-३५) पुरुष :प्रथम- ज्ञानेश्वर मोराघाद्वितीय- अनिल यादवतृतीय- सर्वेश कुमार
१० किलोमीटर (३६-४९) पुरुष:प्रथम- कृष्णा पालद्वितीय- राजेश रामचंद्र खारतृतीय- सावलीराम शिंदे
१० किलोमीटर(५० आणि त्यावरील) पुरुष:प्रथम- अशोक अमानेद्वितीय- लक्ष्मण यादवतृतीय- जोचिम कोरिया
१० किलोमीटर (१६-३५) स्त्री:प्रथम- रोहिणी पाटीलद्वितीय- कविता भोईरतृतीय- मिनाजला नदाफ
१० किलोमीटर (३६-४९) स्त्री:प्रथम- डॉ इंदू टंडनद्वितीय- प्रतिभा नाडकरतृतीय- डॉ गीतिका दशेरिया
१० किलोमीटर(५० आणि त्यावरील) स्त्री:प्रथम- हेमा रुपानी५ किलोमीटर (१६-३५) पुरु ष:प्रथम- दिनेश गुरुनाथ म्हात्रेद्वितीय- प्रदीप पवारतृतीय- प्रकाश दायत
५ किलोमीटर (36-49) पुरुष:प्रथम- आनंद राम वाघरेद्वितीय- रजनिश कुमारतृतीय- सचिन धोंडा बायकर
५ किलोमीटर(५० आणि त्यावरील) पुरु ष:प्रथम- केशव मोतेद्वितीय- मिलिंद नाझिरकरतृतीय- मोरेश्वर पडमन पाटील
५ किलोमीटर (१६-३५) स्त्री:प्रथम- मानसी खामगरद्वितीय- ओमिगा कोळीतृतीय- प्रतीक्षा नाईक
५ किलोमीटर (३६-४९) स्त्री:प्रथम- आरती सावेद्वितीय- प्रतिमा एस पाडियारतृतीय- नॅन्सी पिंटो