पालघर : मुरबे येथील एका मच्छीमाराच्या जाळ्यात सापडलेल्या घोळ माशाच्या ७२० ग्रॅमच्या बोथाला (फुप्फुसांची पिशवी) व्यापाऱ्याने ५ लाख ५० हजारांचा भाव दिला असून, तो आतापर्यंतचा उच्चांक समजला जातो. जिल्ह्यातील किनारपट्टीवरील सातपाटी, मुरबे, डहाणू, केळवे आदी बंदरांत घोळ, दाढ मासे पकडण्यासाठी वागरा पद्धतीच्या जाळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या मासळीपेक्षा त्यांच्या पोटातील बोथाला खूप चांगला भाव व्यापाºयांकडून दिला जातो. वाम, कोत, शिंगाळा आदी मच्छीच्या बोथालाही चांगली मागणी आहे.>सौंदर्य प्रसाधनातहीहोतो वापरघोळ मच्छीच्या मांसाला ८०० ते १ हजार रुपये प्रति किलो दर मिळत असला, तरी नर जातीच्या बोथाला सर्वाधिक मागणी असून, मादी जातीच्या बोथास ५ ते १० हजार रुपयांपर्यंत किंमत मिळते. त्याचा वापर निसर्ग सौंदर्य प्रसाधनात, शस्त्रक्रियेचे टाके घालण्यासाठी वापरल्या जाणाºया धाग्याच्या निर्मितीसाठी व औषधे बनविण्याकरिता केला जातोे.उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून जिल्ह्यात स्थायिक झालेल्या व्यापाºयांकडून हे बोथ खरेदी केले जातात.
घोळ माशाच्या बोथाला मिळाला साडेपाच लाखांचा विक्रमी भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 5:16 AM