विक्रमगड : सध्यस्थित विक्रमगड व विविध परिसरात डासांची मोठया प्रमाणावर पैदास झाली असून सकाळी-सायंकाळी व रात्री डासांच्या चाव्याने अंगावर गाठी उमटत असून या डासांच्या चाव्यामुळे वृध्द, महिला व लहान मुले यांच हाल दिसत आहेत. या समस्येने नागरिक त्रस्त झाले असले तरी आरोग्य विभागाचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत़ जागोजागी साठलेल्या सांडपाण्याच्या डबक्यांवर डासांची मोठी पैदास होत असून घरातील कानाकोप-यांत डासांचे मोठे साम्राज्य असते त्यावर कितीही उपाय योजना करा. मात्र डास हटत नाही आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य अशी फवारणी केली जात नसल्याने डासांचे मूळ नष्ट होण्या एैवजी वाढीस लागलेले आहे़ याचा परिणाम जनतेला मलेरियाशी सामना करावा लागण्यात होतो. सायंकाळच्या व सकाळच्या वेळेस जर डासांना मारण्याकरीता फेरफटका मारला तर त्यात अनेक डास मरतात. रुग्ण मलेरियातून बरा होईपर्यत किमान एक ते दिड महिना लागतो. (वार्ताहर)
विक्रमगडमध्ये डासांचे साम्राज्य
By admin | Published: October 12, 2016 3:48 AM