वाडा : सद्या रस्त्यावरील वाढलेले अपघाताचे प्रमाण हे मानवी चुकांमुळेच वाढले आहेत. वाहन चालविण्याचे नियम प्रत्येक चालकाने काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मानवसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर भोळे यांनी वाडा येथे सुरक्षितता मोहिमेअंतर्गत बोलताना केले.राज्य परिवहन महामंडळ वाडा आगाराच्या विद्यमाने वाडा आगारामध्ये सुरिक्षतता मोहिमेअंतर्गत नुकताच कार्यक्रमाचे आयोजित केला होता. या कार्यक्र मासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मानवसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर भोळे, प्रादेशिक कार्यालय मुंबई येथील सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक युवराज गंभिरे, आगार प्रमुख विजय गायकवाड यांनी चालक व वाहक यांना यावेळी मार्गदर्शन केले.नशा करु न, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, अमर्याद वेग अशा विविध मानवी चुकांमुळेच अपघात होत असतात. तसेच अनेक नियमांचे उल्लंघन चालकांकडून होत असल्यानेही अपघात घडतात. वाहनांच्या तांत्रिक बिघाडापेक्षा मानवी चुकांमुळेच अपघाताताचे प्रमाण वाढले असून हे प्रमाण घटविण्यासाठी प्रत्येक चालकाने काळजीपूर्वक वाहन चालवावे असे आवाहन भोळे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे आयोजनात वाडा आगारातील शांताराम पाटील, एम.ए.आत्तार, आर. एम. गावित, आर.के. गायकर, आर.टी. मिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले होते.
‘जास्तीत जास्त अपघात मानवी चुकांमुळेच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:34 AM