पालघर : सफाळे येथून लोकलने पालघरला प्रसूतीसाठी निघालेल्या कमली सवरा या आदिवासी महिलेने लोकल मध्येच मुलगी जन्म दिला. लोकल पालघर स्टेशनला आल्यावर विश्रांतीगृहात तिने मुलाला जन्म दिला. नवर्षाच्या पहाटेलाच निसर्गाने जुळ्याची भेट दिल्याने सवरा कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे.अंकुश सवरा हा हमाली करीतो. सफाळ्यातील वडखड (देऊळ पाडा) येथे आपली पत्नी व एका मुलांसोबत राहतो. त्यांची पत्नी गरोदर राहिल्यानंतर तिची तपासणी नेहमी सरकारी दवाखान्यात केली जात होती. मंगळवारी पहाटे अचानक तिला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर तिच्या पतीने रिक्षा द्वारे तिला सफाळ्यातील ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र पोटात जुळी बाळे असल्याने इथे असली अवघड प्रसूती होणार नसल्याचे कारण सांगून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तात्काळ सफाळे स्टेशन वर डहाणू कडे जाणारी ८.१० ला आलेली लोकल त्यांनी पकडली. सर्वसाधारण डब्यात हे सर्व बसलेले असतांना तिच्या प्रसूती वेदना वाढू लागल्या. केळवे स्टेशन आल्यावर तिला वेदना असह्य झाल्यानंतर डब्यातील ४-५ उपस्थित महिला तिच्या मदती साठी पुढे सरसावल्या. मिळेल त्या साधनांनी आडोसा निर्माण करून तिची प्रसुती घडविली जात असतांना तिची नैसर्गिकरित्या प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. तो पर्यंत लोकल पालघरच्या दिशेने वेगाने निघाली होती. ती पालघर स्टेशन वर थांबल्यानंतर काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखून चेन पुलिंग केल्याने ही बाब रेल्वे महिला पोलिसांना कळली. त्यांनी तात्काळ ग्रामीण रु ग्णालयात संपर्क साधला असता डॉ. उमेश डुम्पलवार, डॉ.राजेंद्र चव्हाण, प्रणाली वर्तक महिला पोलीसांनी तिला विश्रांतीगृहात आणले. तेथील टेबलावरच त्या महिलेने मुलाला जन्म दिला. दोघेही सुखरूप असून पालघर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मातेने दिला लोकलमधे लेकीला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 11:54 PM