शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

मोटारसायकल अ‍ॅम्ब्युलन्सचे उद्घाटन; आरोग्यमंत्र्यांना मिळाली लंडन प्रयोगातून प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 3:06 AM

या तालुक्याचा परिसर डोंगराळ व दुर्गम भागात विखुरलेला असल्याने खेडोपाड्यांतील आजारी रुग्णांपर्यत अत्यावश्यक औषध उपचार तात्काळ पोहोचावेत यासाठी १०८ या मोटारसायकल अ‍ॅम्ब्युलन्सचे उद्घाटन आज आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते पार पडले.

- हुसेन मेमन, रविंद्र साळवेमोखाडा : या तालुक्याचा परिसर डोंगराळ व दुर्गम भागात विखुरलेला असल्याने खेडोपाड्यांतील आजारी रुग्णांपर्यत अत्यावश्यक औषध उपचार तात्काळ पोहोचावेत यासाठी १०८ या मोटारसायकल अ‍ॅम्ब्युलन्सचे उद्घाटन आज आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याचे आयोजन येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेले होते. याप्रसंगी डॉ.सावंत यांनी १०८ मोटारसाईकल अ‍ॅम्ब्युलन्स लंडन येथे बघितल्यानंतर अशी सेवा प्रायोगिक तत्वावर मुंबई येथे दहा मोटारसायकल अ‍ॅम्ब्युलन्सच्या स्वरूपात सुरू करण्यात आली व तिने आजवर अडीच हजार रुग्णांचे प्राण वाचवले, असे सांगितले.या अ‍ॅम्ब्युलन्सचा उपयोग चांगला होत असल्याने अशा पाच मोटारसायकल अ‍ॅम्ब्युलन्स पालघर जिल्ह्यासाठी देण्याचा निर्णय मी घेतला. या अ‍ॅम्ब्युलन्सचा राईडर हा स्वत: डॉक्टर असल्याने रुग्णांपर्यत वेळीच औषध उपचार मिळण्यास मदत होईल. तसेच राज्यात अजून चाळीस मोबाईल मेडिकल युनिट चालू करणार असून यातील काही युनिट पालघर जिल्ह्यासाठी देण्यात येतील यामध्ये औषधे, एक्स रे मशिन, डॉक्टर्स, लॅबोरटरी, मेडिसन इत्यादी अत्याधुनिक सोयी सुविधा असतील. मोखाड्यातील कुपोषण व बेरोजगारीचे प्रमाण घटविण्यासाठी जंगलातील औषधी वनस्पतींपासून आयुर्वेदीक औषधनिर्मितीची कंपनी चालू करण्याची योजना आहे. या कंपनी मार्फत आदिवासींना रोजगार उपलब्ध करुन कुपोषणावर मात कशी करता येईल यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले तसेच तालुक्यात ३२७ बालके कुपोषित असून ५३ बालके मृत्यूच्या दाढेत आहेत व नुकतेच २ बालमृत्यू झाले असतांना मंत्र्यांनी त्या कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट घेण्याचे टाळले. त्याचबरोबर या रुग्णालयात सीमेन्स व आरोहण या सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सोनोग्राफी मशिन चा लोकार्पण सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी प्रशांत नरनावरे यांनी जिल्ह्यातील साडे दहा हजार शेतकऱ्यांना आंबा, काजू यासारखी रोपे मोफत देऊन ती वर्षा पर्यत लाभार्थ्यास प्रती दिवस शंभर रु पये मजुरीसह देण्यात येईल असे सांगितले. तर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी रोजगार हमी ची कामे लवकर सुरू करावीत व त्याची मजुरी आॅनलाईन जमा न करता काम झाल्या नंतर लगेचच मजुरांना द्यावी तसेच आशा कार्यकर्त्यांचे मानधन वाढवावे, अशी मागणी आरोग्य मंत्र्यांकडे केली. या कार्यक्र मास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानरे, सीमेन्स व आरोहणचे डॉ.श्रीनिवास, अनिस मोहम्मद, अंजली कानेटकर, हेलेन जोशी, वैद्यकीय अधिक्षक महेश पाटील, नगराध्यक्षा चौधरी,गटविकास अधिकारी गोंडाबे, नासब तहसिलदार कोरडे, शिवसेना तालुका प्रमुख अमोल पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :deepak sawantदीपक सावंतVasai Virarवसई विरार