रविंद्र साळवे
मोखाडा : डोंगराची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी करवंद मानवी अतिक्र ाणामुळे दुर्मिळ होत चालली आहे. पूर्वी सहजासहजी उपलब्ध होणारी डोंगराची काळी मैना आता मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
पालघर जिल्हाच्या आदिवासी पट्यात माळरानावर डोंगर कपारीत नैसिर्गक रित्या बहरणारी काळी मैना म्हणजे करवंदे कमी प्रमाणात ऊपलब्ध होत आहेत विविध कारणांसाठी करवंदाच्या झुडपाची होणारी तोड व जंगलाना लागणारे वनवे यामुळे करवंदे नष्ट होत चालली आहेत. उन्हाळ्यात करवंदाना मोठी मागणी असते करवंदाचे झाड म्हणजे करवंदाच्या जाळी नैसिर्गकरित्या डोंगर कपारात वाढतात कोणत्याही कृत्रिम खतपाणी व संरक्षणाविना वाढणारी करवंदे कच्ची असताना वनात पिकल्यावरही रुचकर लागतात शिवाय जाम सिरप बनवण्यासाठी करवंदे वापरली जातात. आदिवासी बांधव ऊन्हाळ्यात करवंदाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात परंतु गेल्या काही वर्षापासुन शेती खाणकाम व नागरीकरणासाठी जंगलावर होणारे अतिक्रमण जंगलाला लागणारे व लावण्यात येणारे वनवे बदलेले हवामान यामुळे करवंदाच्या नैसर्गिक उत्पादनात घट झाली आहे, यामुळे काळाच्या ओघात व हे दुष्टचक्र असेच चालू राहील्यास डोंगराची काळी मैना म्हणून ओळख असलेली करवंदे दिसेनाशी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.