डहाणू : मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर उलट दिशेने येणारी वाहने, मोकाट जनावरे, तसेच हायवेच्या कडेला उभी राहणारी वाहने यामुळे चालकांना अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे.प्राथमिक सोयीसुविधांअभावी या महामार्गावर नागरिकांची गैरसोय होत आहे. सुसज्ज रुग्णालय नसल्याने अपघातातील जखमींना वेळेवर योग्य उपचार मिळत नाहीत. परिणामी वर्षभरात असंख्य अपघात होऊन ७० जणांचे बळी गेले आहेत. महामार्ग ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या झाली आहे. डहाणू तालुक्यातून हा महामार्ग जात असल्याने व समस्या वाढल्याने वाहतुकदारांना त्रास होत आहे. विशेष म्हणजे महामार्गाशेजारी दोन्ही बाजू मोठया प्रमाणात आदिवासी बहुल गाव खेडे, पाडे, असल्याने कामधंद्यानिमित्त बाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांना पादचारी पुलां अभावी जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागतो आहे. राष्ट्रीय महामार्गावरील समस्या असंख्य आहेत. रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर वाढलेला आहे. प्राथमिक सुविधांच्या अभावामुळे या मार्गावरून प्रवास करणाºयांचा जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागतो आहे.महामार्गांवरील प्राथमिक सोयी सुविधांची पूर्तता न केल्याने वाहनचालकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. परंतु त्याची फिकीर कोणाला असल्याचे दिसत नाही.जीव मुठीत धरून प्रवासराष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा सेवा रस्ता असणे आवश्यक आहे. मात्र तो नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. परिसरातील भटकी जनावरे महामार्गावर येतात त्यामुळे अपघात होत आहेत. महामार्ग ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असंख्य समस्यांचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:02 PM