मुरबाड : भूजल पातळी वाढविण्यासाठी शासनाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम सुरू केली आहे. मात्र, ठेकेदाराने इंदे येथे केलेल्या निकृष्ट कामामुळे या मोहिमेला हरताळ फासला गेल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. येथील शेतकºयांमध्ये संतापाची लाट पसरली असून या ठेकेदाराला कामाचे बिल दिले तर पंचायत समितीवर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तंटामुक्त समितीचे प्रकाश शिंदे, पोलीसपाटील महादेव आलम आणि शेकडो शेतकºयांनी दिला आहे.
पावसाळी शेतीतून मिळणाºया उत्पन्नाशिवाय शेतकºयांना उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नसल्याने शासनाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेतून जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागामार्फत २०१८-१९ या वर्षी मौजे इंदे येथील नाल्यावर १५ लाखांचा सिमेंट बंधारा मंजूर केला. हे काम मे. संदेश सुनील देशमुख, मु. तळेगाव या एजन्सीला देण्यात आले. मात्र, ठेकेदाराने हे काम सुरू करताना संबंधित शेतकरी तसेच शासकीय यंत्रणेला विश्वासात न घेता आठवड्याभरात काम पूर्ण केले. ठेकेदाराने केलेल्या या सिमेंट बंधाºयाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात दगडाचा वापर केल्याने माती बंधाºयाप्रमाणे धरणाचे पाणी झिरपत जाऊ लागल्याने संतप्त शेतकºयांनी घटनास्थळी अधिकाºयांना बोलावून त्या बंधाºयाच्या निकृष्ट कामाचा पंचनामा केला, तसेच या निकृष्ट कामाचे बिल ठेकेदाराला देण्यात येऊ नये, अशी मागणीही केली.
शेतकºयांच्या मागणीनुसार लघुपाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्यांनी हे काम तत्काळ काढून टाकावे आणि पुन्हा सुरू करताना कार्यालयाची परवानगी घ्यावी, असे आदेश दिले. मात्र, हे आदेश पाळले गेले नाहीत. नव्याने केलेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात दगडगोट्यांचा वापर केल्याने पहिल्याच पावसाळ्यात १५ लाखांचा हा सिमेंट बंधारा वाहून गेला आणि त्यातील दगडगोटे बाहेर पडले. तरीही या वाहून गेलेल्या बंधाºयाचे बिल काढण्याच्या हालचाली सुरू असल्याचे शेतकºयांना समजताच त्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.या सिमेंट बंधाºयाचे काम हे निकृष्ट पद्धतीने केल्याने त्याचे बिल काढण्यात येणार नाही. - पी.आर. तडके, उपअभियंता, लघुपाटबंधारे, पंचायत समिती मुरबाड.