शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

शितपेट्यांसाठी नायगांव कोळीवाड्यातील कोळी महिलांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 6:10 PM

दरम्यान यावेळी सोसायटीचे सेक्रेटरी सच्चिदानंद शेवाळे यांना जाब विचारत महिलांनी त्यांना घेराव घातला. 

- आशिष राणे 

वसई- वसई तालुक्यातील नायगांव कोळीवाड्यातील कोळी महिलांना मासळी साठवून ठेवण्यासाठी मत्स्यविभागाकडून शितपेट्या मिळतात मात्र मागील ९ महिन्यांपासून शितपेट्या मिळण्यापासून वंचित राहीलेल्या नायगाव  कोळीवाडा विभागातील कोळी महिला संतप्त झाल्याने अखेरीस या कोळी महिलांनी येथील नायगांव मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये गुरुवार ( दि. 23) रोजी आंदोलन केले यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या. 

दरम्यान यावेळी सोसायटीचे सेक्रेटरी सच्चिदानंद शेवाळे यांना जाब विचारत महिलांनी त्यांना घेराव घातला. शितपेट्यांबाबत विचारणा केली असता त्यांच्या जवळ शितपेट्यांची महिलांची यादीच नसल्याचे त्यांनी सांगितले. याउलट शितपेट्यांऐवजी कोळी महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार असल्याचे ही  शेवाळे यांनी सांगितले, मात्र  ना शितपेट्या आल्या ना खात्यात पैसे आले त्यानुसार या कोळी महिलांनीं संस्थेच्या सेक्रेटरींवर त्याचा रोष काढला.

एकुणच अर्नाळा व खानिवडे या दोन्ही कोळीवाडयात या शितपेट्या दिल्या गेल्यात मग अजूनपर्यंत नायगाव कोळीवाडा मधील महिलांना अद्यपही शितपेट्या मिळाल्या नसल्याने त्रस्त कोळी महिलांनी हे आंदोलन केल्याचे नायगाव कोळीवाडा ग्रामस्थांनी लोकमत ला सांगितले. कोळी महिला या शितपेट्या मध्ये आपली मच्छी ठेवण्यासाठी उपयोगात आणतात जर शितपेट्या नसतील तर मच्छी विक्री व मच्छीची ने- आण कशी करणार त्यात या शितपेट्याची किंमत एक नग साधारण ६ हजार रुपये पर्यंत आहे.

आम्हाला शितपेट्या मिळण्यासाठी  आम्ही मार्च 2021 रोजी अर्ज केले होते परंतु आज ९  महिने उलटूनही शितपेटी दिल्या नाहीत, अशा शितपेट्या अर्नाळा कोळीवाड्यासह दुसर्‍या अनेक कोळीवाड्यात देण्यात आले पण आम्हाला अजून दिल्या नाही, याबाबत आम्ही हा घेराव केला.-रसिका कोळी नायगाव कोळीवाडा, वसई (पश्चिम)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार