पालघर : मोखाडा तालुक्यातील शेंड्याची मेट येथील एक शिक्षक आणि केंद्रप्रमुखाचे शिक्षणाधिकार्ऱ्यांनी केलेले निलंबन अन्यायकारक असून ते तात्काळ रद्द व्हावे यामागणीसाठी शनिवारी महाराष्ट्र स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पालघर जिपच्या शिक्षण विभाग कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शाळा तपासणी व भेटी अंतर्गत २ फेब्रुवारी रोजी जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत आणि गटशिक्षणाधिकारी किरण कुंवर यांनी मोखाड्यातील शेंड्याची मेट केंद्र खोच येथीग शाळेत एकाच दिवशी तीन पथके पाठवून तपासणी केली. पहिल्या दोन पथकांना संबंधित शिक्षकांनी समाधानकारक उत्तरे देऊनही भागवत आणि कुंवर यांनी प्राथमिक शिक्षक राजाराम पाटील आणि केंद्र प्रमुख पांडुरंग वारघडे यांना निलंबित केले होते. वसतिगृहासंदर्भात अनेक चुकीचे आक्षेप ठेवून आकसापोटी ही कारवाई केल्याने शनिवारी शिक्षक संघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. १५ दिवसात हे निलंबन रद्द न केल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा या वेळी देण्यात आल्याचे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ भोईर यांनी सांगितले. आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांना अॅट्रॉसिटीच्या धमक्या१प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र तपासणी अंतर्गत शाळांना देण्यात आलेल्या निधीचा योग्य विनियोग होतोय की, नाही. विद्यार्थ्यांची प्रगती होते की, नाही याबाबी तपासण्यासाठी भागवत आपल्या टीम सह गेल्यानंतर हंगामी वसतिगृहाचा बोगस प्रस्ताव सादर करून वसतिगृह सुरु ठेवणे, निधीचा योग्य विनियोग न करणे, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक अधोगती, २० विद्यार्थी अनुपस्थित असणे आदी गंभीर बाबी तपासणी अंती आढळून आल्या.२या तपासणीचा संबंधितांना राग आल्याने त्यांनी ग्रामस्थांना जमा करून गावातील महिलांना पुरु ष अधिकाऱ्यांच्या समोर पाठवणे, अपशब्द वापरणे असे उद्योग सुरु केले. मग आम्ही कार्यालयात येताचा पुन्हा अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देण्यात आल्या अशी माहिती शिक्षणाधिकारी भागवत यांनी लोकमतला दिली. त्यामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे ही कारवाई करण्यात आली असून ती योग्य असल्याची माहितीही त्यांनी दिली.
निलंबन माघारीसाठी स्वाभिमानचे आंदोलन
By admin | Published: February 21, 2017 5:12 AM