- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : नव्याने मधमाशापालन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे व आधीपासून या व्यवसायात असणाऱ्यांकरिता कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे मधमाशापालन कार्यशाळा आयोजित करण्यात येते. या व्यवसायातून रोजगार निर्मितीसह शेती उत्पादनात वाढ आणि नागरिकांना दर्जेदार मध उपलब्ध होऊ शकते. शिवाय पंतप्रधानांच्या स्वप्नातील मधूक्रांती कार्यक्रमाला त्यामुळे बळकटी मिळणार आहे.या प्रशिक्षणातून मधमाशीपालन हा शेतीला पूरक व जोडव्यवसाय असून शुद्ध नैसर्गिक मधाचे उत्पादन घेता येते. मधमाशांद्वारे परागीभवन घडवून अन्नधान्याच्या व फळबागामध्ये उत्पादनात लक्षणीय वाढ कशी करावी याबाबत माहिती देण्यात येते. त्यानंतर सातेरी, मेलिफेरा आणि डंखरहित जातीच्या पाळीव मधमाशांची योग्य प्रकारे हाताळणी प्रात्यक्षिकासह दाखविण्यात येते. निसर्गात आढळणाºया मधमाश्या पेटीत भरण्याची कला व जंगली मधमाशांपासून मधाचे उत्पादन कसे घ्यावे हे प्रशिक्षणार्थ्यांना शिकविण्यात येते. शिवाय मधमाशांचे शत्रू, रोग व त्यापासून संरक्षण यासह शासकीय योजनाविषयी मार्गदर्शन केले जाते. याशिवाय प्रगतीशील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून शंका निरसन व समाधान होते. याबरोबरीने फार्म व्हिझीट व प्रात्यक्षिकानंतरप्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास मधमाशी हाताळण्याची संधी दिली जाते. दरम्यान याकरिता प्रशिक्षण शुल्क ५०० रुपये आकारण्यात येते. त्यानंतर चहा, न्याहारी, जेवण आणि प्रशिक्षण साहित्य व प्रमाणपत्र देण्यात येते. या पूर्वी हे प्रशिक्षण घेतले असेल आणि पुन्हा प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांना २०० रुपये फी आकारण्यात येते.खादी ग्रामोद्योग मंडळाचा पुढाकारया मंडळामार्फत मानव विकास मिशन कार्यक्र मांतर्गत तालुक्यातील झारली या आदिवासी पाड्यातील दहा युवकांना प्रत्येकी पाच मधपेट्या मधयंत्र व संरक्षण जाळी इत्यादी साहित्याचे विनामूल्य वाटप केले. तसेच शेती उत्पादन वाढीसाठी ४० ते ६० टक्के परागीभवनाकरिता मधमाशांचे संवर्धन महत्त्वाचे आहे. यादृष्टीने खादी ग्रामोद्योग मंडळ ठाणे यांचेमार्फत जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी पी.पी.सावंत आणि कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उत्तम सहाणे तसेच खादी ग्रामोद्योग आचे पर्यवेक्षक संजय पाटील यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.आज शेती क्षेत्र कमी होत असून उत्पादन वाढविण्याकरिता चांगले परागीभवन होणे आवश्यक आहे. त्यामुळे मधमाशा वाचल्या पाहिजेत. पिकाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ मधमाशांमुळे सहज शक्य असल्याने त्यांच्या पालन-पोषण, संवर्धन व संरक्षणास अनन्य साधारण महत्व आहे. कृषि विज्ञान केंद्र व खादी ग्रामोद्योग प्रशिक्षणाचे आयोजन करते. कोसबाडला प्रत्येक महिन्याच्या दुसºया गुरूवारी असे प्रशिक्षण आयोजिले जाते.- प्रा. उत्तम सहाणे, किटकशास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र
बोर्डीत मक्षिकापालनातून मधूक्रांतीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:44 PM