पालघर : पालघर जिल्हा निर्मितीच्या तीन वर्षाचा कालावधीत जिल्हात विकासाच्या दृष्टीने विविध विकासकामे सुरू आहेत. सामान्य माणसाला केंद्रबिंदु मानून विकासाचे नियोजन करण्यात आले असून जिल्हयाची शाश्वत व नियोजनबध्द विकासाकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री व पालकमंत्री विष्णु सवरा यांनी आज ध्वजवंदना दरम्यान केले.भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आज पालकमंत्री विष्णु सवरा यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर च्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निधि चौधरी, पोलिस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, ई मान्यवर व जेष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सवरा म्हणाले की पालघर जिल्ह्याचे सुसज्ज व आदर्श असे प्रशासकीय मुख्यालय नजीकच्या काळात उभे करण्यात येणार असून त्यासाठी सिडकोची मदत घेतील जाणार आहे. याबरोबरच पालघर शहराच्या नियोजनबध्द विकासावरही भर दिला जाणार आहे. जिल्हयात राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्र माअतर्गंत सर्व गांवाचे सात बारा संगणकीकरण झालेले असून संगणकीकृत सात बारा हस्तलिखित सातबाराची तंतोतत जुळवण्याचे काम ही पुर्णत्वाकडे आले आहे. जिल्हयातील सर्व गावामध्ये चावडी वाचण्याचा कार्यक्र म सुरु आहे. नजीकच्या काळामध्ये जिल्हयातील जनतेला आॅनलाईन सातबारा सुलभरीत्या मिळणे शक्य होणार आहे. जिल्हयात शेतीबरोबरच पर्यटन व्यवसायला मोठी संधी असल्याने पर्यटन समृध्द करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील रस्त्यांचा विकास करताना जिल्ह्यातून जाणाºया तीन राष्ट्रीय महामार्गसाठी केंद्र व राज्य सरकारचा निधी मोठयाप्रमाणात मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील बालमृत्यू व कुपोषण कमी करण्यासाठी कालबध्द कार्यक्र माद्वारे उपाययोजना करण्यात येत आहेत.दिल्ली हाट धर्तीवर राज्यातील आदिवासी कलासंस्कृतीच्या प्रसिध्दीसाठी आदिवासी कारागिरांच्या वस्तुंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध देणे, आदिवासी संस्कृतीची ओळख ई.सर्व घटकापर्यंत पोहचिवण्यासाठी मनोर येथे वारली आदिवासी हाट उभारण्यात येणार आहे. या उपक्र माव्दारे आदिवासींची जिवनपध्दती, त्यांचे पारंपारिक उत्सव, हस्तकलेच्या वस्तु, चित्रे इ. चे प्रदर्शन होणार आहे.ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखिनय कामिगरी करणाºया पोलिस अधिकाºयाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उत्कृष्ट काम करणाºया अंगणवाडी सेविका, मदतनिस यांचाही पालकमंत्रयाच्या हस्ते प्रशिस्तपत्रक देवून गौरविण्यात आले.प्रारंभी पालकमंत्र्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आहुती देणाºया जिल्ह्यातील पाच हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना वंदन केले.>युनिसेफच्या मदतीने काम जोमाने सुरुस्वच्छ भारत अभियानात आपल्या जिल्ह्याने चांगली कामिगरी केली आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी जव्हार, मोखाडा, तलासरी व वाडा हे चार तालुके १०० टक्के हागणदारीमुक्त झाले आहेत. वसई ९९ टक्के, पालघर ९३ टक्के, डहाणू ८४ टक्के, विक्र मगड ८१ टक्के याप्रमाणे तालुके हागणदारीमुक्त झालेले आहेत. या संदर्भात ग्रामपंचायतींना मार्गदर्शन केले जात आहे.शौचालय उभारणीच्या कामामध्ये विक्रमगड आणि जव्हार तालुक्यात युनिसेफच्या मदतीने व इतर भागात जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी ई. च्या मदतीने काम जोमाने सुरु असून जिल्ह्यातील ४७३ पैकी ४६५ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून लवकरच पालघर जिल्हा निर्मल जिल्हा म्हणून घोषित करण्यात असा विश्वास पालकमंत्री सवरा यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याची नियोजनबद्ध विकासाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 2:09 AM