नालासोपारा : वसई विरार शहरात ९५ टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा करणाºया आयुक्त बी.जी.पवार आणि त्यास दुजोरा देणाया महापौर रुपेश जाधव यांच्या दिशाभूल करणाया खोट्या दाव्याचा पर्दाफाश विरार शिवसेना शहर शाखेच्यावतीने करण्यात आला आहे. शहर प्रमुख मनीष वैद्य यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी वसई-विरार शहर मुख्यालयासमोर अधिकाऱ्यांच्या पुतळ्याला चिखल फासणारे आंदोलन केले. त्यासमयी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मानले यांनी आंदोलनकर्त्यांकडे जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर नाल्यात साचलेला गाळ टाकून तीव्र निदर्शने करण्यात आली.
शिवसेना विरार शहर शाखेच्या वतीने शिवसैनिकांनी विरार पूर्वेकडील काही ठिकाणी पाहणी केली असता अनेक ठिकाणी अत्यंत दननीय परिस्थिती दिसून आली. विरार शहरातील मानवेलपाडा, फुलपाडा, जीवदानी मंदिर रोड, सहकार नगर, ९० फिट रोड, वरदविनायक लेन, चंदनसार रोड इत्यादी ठिकाणी अद्याप नालेसफाई झाली नसून अनेक गटारे/नाले नादुरुस्त होते. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. विरार शहराव्यतिरिक्त इतर अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती असून ९५ टक्के नालेसफाईचा केलेला दावा फेल ठरला असून महानगरपालिका प्रशासनाने वसई-विरार मधील जनतेची घोर फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आंदोलन संपल्यानंतर राजेंद्र लाड यांची तयार केलेली प्रतिमा महापालिकेच्या बाहेरच पडली होती त्यानंतर तातडीने सफाई कर्मचायांना कामाला लावून ती तेथून हटविण्यात आली.गेल्या पावसाळ्यात नालेसफाई व्यविस्थत न झाल्यामुळे शहरात पाणी शिरले होते, अनेक वस्त्या पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कळीत झाले होते, दरम्यान याही वर्षी अर्धवट नालेसफाईमुळे पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होणार असल्याने शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले. महापालिका चोर है! राजेंद्र लाड यांची खुर्ची खाली करा. लाड यांचे लाड आयुक्त अजून किती पुरविणार. - मनीष वैद्य, शहरप्रमुख, विरार शिवसेना