शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

कचऱ्यावर महापालिकेने खर्च केले ८१७ करोड; वसई-विरार महापालिका नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 11:20 PM

स्वच्छता अभियानाला अपयशी करीत आहेत कंत्राटदार

नालासोपारा : दरवेळी या ना त्या आरोपामुळे किंवा कारणामुळे सदैव चर्चेत असलेली वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिसरात अनिधकृत बांधकामे, नाल्यांची किंवा गटारांची साफ सफाई न होणे, रस्त्याच्या कडेला असलेले कचºयाचे ढीग, फूटपाथावरील तुटलेली गटारांची झाकणे यासर्व बाबींवर करोडो रुपये खर्च करते पण परिस्थिती जशीच्या तशीच आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेने हद्दीमध्ये साफसफाई करण्यासाठी मागील पाच वर्षामध्ये ८१७ करोड ८ लाख ३१ हजार रुपये केल्याचे कळते. या केलेल्या खर्चामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. जर महानगरपालिकेने सर्वत्र साफसफाई केली असती तर हे कचºयाचे ढीग सर्वत्र दिसले नसते, महानगरपालिकेने हा खर्च फक्त कागदावरच केला असून स्वच्छ भारत अभियानांतर्गत येणारा निधी महानगरपालिका अधिकारी आणि कंत्राटदार गिळून हडप करीत असल्याचा धक्कादायक आरोप सामान्य नागरिकांनी केला आहे. तर देशामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या सर्व्हेक्षणांमध्ये वसई विरार महानगरपालिका तिसºया नंबरवर असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ऊन आणि उकाडयामध्ये रस्त्याच्या किनाºयालगत कचºयाच्या ढिगाºयातून येणाºया दुर्घगंधीच्या उग्र वासामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. या कचºयाच्या समस्यांचे छायाचित्रावरून स्वच्छ भारत अभियानात वसई विरार शहर महानगरपालिका नापास झाली आहे.

याबाबतीत स्थानिक नागरिकांशी विचारणा केल्यावर सांगितले की, कचरा उचलणारे येतात पण एका किंवा दुसºया विभागातून कचºयाची गाडी भरली की, परत येतच नाही. त्यामुळे कचºयाचे ढीग जमतात.कुठे आहेत कचºयाचे ढीग आणि घाणीचे साम्राज्यनालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन, गावराई पाडा, जीवन नगर, गौराई नाका, धानिवबाग, वाकणपाडा, नवजीवन, वालीव, धुमाळ नगर, सातीवली, भोयदापाडा तसेच विरार पूर्वेकडील चंदनसार, कातकरी पाडा, फुलपाडा, सहकार नगर कारिगल नगर, मोरेंगाव, अलकापुरी, वसई, नवजीवन, शांति नगर, रिचर्ड कम्पाउंड, गोलानी, खैरपाडा, फादरवाडी, गोखिवरे, वंसत नगरी, अग्रवाल, लिंक रोड, चिंचपाड़ा, वसई पश्चिमेकडील भाजी मार्केट, अंबाडी रोड, पापडी, वसई कोळीवाडा अश्या अनेक परिसरात कचºयाचे ढीग आणि घाणीचे साम्राज्य आजही पडून आहे.मोठे मोठे गाजर दाखवून महानगरपालिका आल्यावर सुविधा मिळणार असे सांगितले पण प्रत्यक्षात उलटेच अनुभवायला मिळत आहे. या कचºयाच्या गाड्या कचरा उचलल्यावर दुर्गंधी आणि घाण वास पसरू नये म्हणून काही उपाययोजना करत नाही. - हेमंत रोखीत,संतप्त नागरिककेंद्र आणि राज्य सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेला करोडो रुपयांचा निधी दिला पण यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. कंत्राटदार आणि संबंधित महानगरपालिका अधिकारी करोडो रुपयांची हेराफेरी केली आहे.- राजकुमार चोरघे, आरोपकर्तेआरोपामध्ये काहीही तथ्य नाही. कोणीही यावे आणि चौकशी करावी. - महादेव जवादे, शहर अभियंता, महानगरपालिका