शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

नालासोपा-यातील खुनाचा उलगडा , आणखी दोघांची हत्या करण्याचा होता डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 12:44 AM

नालासोपा-यात हत्या झालेल्या अनोळखी व्यक्तीचा छडा लावून त्याच्या तीन मारेक-यांना नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे

वसई : नालासोपा-यात हत्या झालेल्या अनोळखी व्यक्तीचा छडा लावून त्याच्या तीन मारेक-यांना नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांनी आणखी दोनजणांची हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र, त्याआधीच त्यांना अटक झाल्याने दोन जीव वाचले आहेत.पश्चिमेकडील हनुमान नगरातील एका इमारतीमधील एका खोलीत कुजलेल्या अवस्थेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह २८ आॅक्टोबरला आढळून आला होता. या इसमाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. मात्र, मृत इसम अ़नोळखी असल्याने कोणतेही धागेदारे नसतांना त्याची ओळख पटवून त्याच्या मारेकºयांना अटक केली आहे.या खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक सुहास कांबळे, महेश चव्हाण, सिद्धेश शिंदे, हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्वे, रुस्तम राठोड, हर्षद चव्हाण, अश्विन पाटील यांच्या पथकाने मृत व्यक्तीची ओळख पटविली. सफात अली असगर अली (५५) असे मृत इसमाचे नाव असून तो मानखुर्द येथील रहिवासी असल्याची महत्वाची माहिती हाती लागल्यानंतर नालासोपारा पोलिसांनी त्याच्या मारेकºयांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात आल्या.दीपक लंगडा (३५), प्रजापती (४५) आणि विजय चौहान (२०) या मारेकºयांना मुंबईच्या मानखुर्द परिसरातून अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या जबानीत सफात अली हा त्यांचा साथीदार होता. चौघेही वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवण्याचा व्यवसाय करीत. चौघांनी एका व्यापाºयाला लुटून ठार मारण्याचा कट रचला होता. त्यानंतर त्यांना सिमकार्ड पुरवणाºयाचीही हत्या ते करणार होते. मात्र, सफातने व्यापाºयाला लुटून आपण एकटेच मारणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे लुटीतील हिस्सा मिळणार नसल्याने दिपक, प्रजापती आणि विजय यांनी सफातला ठार मारण्याचा बेत रचला. तिघांनी त्याला मुलगी विकत देतो असे सांगून नालासोपाºयातील हनुमान नगरात आणले होते. तेथील एका इमारतीतील बंद असलेल्या खोलीत चौघे दारू प्यायले. तिघांनी सफातच्या दारूमध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. तो बेशुद्ध पडताच त्याची हत्या करून त्यांनी पळ काढला होता. तिघांनी माहिम येथील व्यापाºयाला लुटून त्याची हत्या करण्यासोबतच सीमकार्ड देणाºयाची रेल्वे रुळांवर नेऊन हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी तिघांना जेरबंद केल्याने दोघांचे जीव वाचले.पुरावा नसतांना तपास चौघेही होते ‘दलाल’कोणताही पुरावा नसतांना तपास पथकाने मृताची ओळख पटवली व त्याच्या तीन मारेकºयांना अटक केली. ते चौघेही देहविक्रयासाठी मुली आणि तरुणी पुरविण्याचा गोरखधंदा करीत होते. एका व्यापाºयाला लुटून त्याची हत्या करण्यावरून त्यांच्यात वाद झाला. व त्याचे पर्यवसन तिघांनी या मयताचा खून करण्यात झाले, असे तपासात निष्पन्न झाले.