वसई - नालासोपा-यातून अपहरण करण्यात आलेल्या नरेंद्र मिश्रा या व्यापाºयाचा मृतदेह भिवंडीजवळील पडघा गावानजिकच्या जंगलात पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात दोन संशयित बंधूंविरोधात गुन्हा दाखल असून ते फरार आहेत.त्यांचा मालाड येथे ड्रेस मटेरियल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी नालासोपारा येथे राहणाºया रोहित आणि पंकज सिंग यांना आठ लाख रुपयांचा माल दिला होता.मात्र, हे दोघेही पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. ४ मार्चला सकाळी रोहित सिंग यांनी नरेंद्र यांना नालासोपारा येथील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. तिथून रोहित नरेंद्र यांना आपल्या कारमधून घेऊ़न गेले होते. तेव्हापासून ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांची पत्नी दिप्ती यांनी केली होती. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रोहित सोबत नरेंद्र कारमधून गेल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पैशाच्या वादातूनच या बंधूंनी त्यांचे अपहरण केल्याची तक्रार दिप्ती यांनी दिल्यानंतर नालासोपारा पोलीस ठाण्यात दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी रात्री भिवंडी पोलीसांना पडघा येथे जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याची माहिती दिल्यावरून तुळींज पोलिस नरेंद्रच्या नातेवाईकांसह घटनास्थळी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी मृत इसमाच्या अंगावरील कपडे आणि इतर साहित्य दाखविले असता तो नरेंद्रचा मृतदेह असल्याची ओळख नातेवाईकांनी पटवली होती. मृतदेह कुजलेला असल्याने पोलिसांनी दफन करून ठेवला आहे. त्यामुळे रविवारी संध्याकाळपर्यंत तो नातेवाईकांना देण्यात आलानव्हता.मारेकºयांना पोलिसांची छुपी साथ?दरम्यान, नरेंद्रचे अपहरण केल्याचा पुरावा पोलिसांना दिला होता. त्यांनी रोहितला दोन वेळा चौकशीच्या नावाखाली पोलीस ठाण्यात बोलावूनही घेतले होते. मात्र, त्याला अटक न करता सोडून देण्यात आल्याने दोन्ही भाऊ आता फरार झाले आहेत. जर तक्रार केल्या केल्या पोलिसांनी त्या दोघांची कसून चौकशी केली असती तर नरेंद्र यांचे प्राण वाचविता येऊ शकले असते. असेही दिप्ती मिश्रा यांनी पोलीस अधिक्षकांकडे केलेल्या तक्रारी म्हटले आहे..
सोपा-यातील अपहृत व्यापा-याची हत्या, पडघा येथे आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 6:39 AM