पालघर / मनोर - पालघर तालुक्यातील सावरे गावात आई आणि दीड वर्षाच्या मुलीच्या दुहेरी हत्याकांडाचा मागमूस मनोर पोलिसांना लागला नव्हता. हातपाय बांधून आई-मुलीचा ओहोळात फेकून दिलेला मृतदेह पाण्यावर तरंगल्यानंतर पोलिसांना या हत्याकांडाची माहिती मिळाली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संबंधित महिलेचा दीर संदीप डावरे आणि नणंद सुमन करबट या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिसऱ्या फरार आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.
सावरे गावाजवळील ओहोळामधील पाण्यात सोमवारी दगडाला बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला. ही माहिती पोलिस पाटील यांनी मनोर पोलिसांना दिली. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर तो वाणीपाडा येथील सुश्मिता प्रवीण डावरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. तिची अज्ञाताने हत्या करून मृतदेह वाहत्या पाण्यात दगडाला बांधून टाकला होता.
रात्री मोबाइलवर बोलताना झडप चौकशीअंती या महिलेची मुलगीही गायब असल्याची माहिती मिळाली. सुश्मिता ही पती व दीड वर्षांच्या मुलीसोबत शेतघरात राहत होती. ३१ ऑगस्टला आरोपी आणि मृत महिलेमध्ये जमिनीवरून वाद झाला होता. महिला रात्री मोबाइलवर बोलताना आरोपीने तिच्यावर झडप घालून तिचा खून केला. त्यानंतर झोपलेल्या मुलीचाही खून करून त्यांचे मृतदेह पिशवीत कोंबून त्यांना दगड बांधून ओहोळात फेकले.
पोलिसी खाक्या मनोर पोलिसांना मृत महिलेचा दीर संदीप डावरे याचा संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच हत्याकांड केल्याचे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दोन्ही मृतदेह ओहोळात दगडाला बांधून टाकल्याचे कबूल केले. याकामी बहीण सुमन हिनेही मदत केल्याची कबुली दिली.