वाडा : तानसा, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी अशा पाच नद्या वाडा तालुक्याला लाभल्या आहेत. मात्र पाण्याबाबत योग्य नियोजन नसल्याने या नद्यांचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. नियोजनाअभावी हा तालुका आजही तहानलेलाच आहे. खानिवली परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी, सिंचनासाठी पाणी तसेच उद्योजकांचा पाण्याच्या प्रश्न सोडवायचा असेल, तर वैतरणा नदीवर नागनाथ येथे बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
वैतरणा नदी किनारी आंबिस्ते गावाच्या हद्दीत नागनाथ हे देवस्थान आहे. या देवस्थानच्या जवळून वैतरणा नदी गेली असून हे देवस्थान उंच टेकडीवर आहे. नदीचा भाग खोल असून येथे मे-जून या अखेरच्या क्षणीही मुबलक पाणी साठा असतो. येथे एक मोठा बंधारा बांधल्यास त्याचा फायदा खानिवली परिसरातील हजारो नागरिक, शेतकरी तसेच उद्योजकांना होऊ शकतो. या बंधाºयामुळे हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येऊन हा परिसर हिरवागार होऊ शकतो. सर्व खेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना, सिंचन योजना राबवून हा प्रश्न मार्गी लावता येईल. त्यामुळे येथे बंधारा बांधण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.नागनाथ येथे बंधारा झाल्यास या परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळून त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल. येथील शेती हिरवीगार होऊन शेतकºयांना दुबार पिके घेता येतील. त्याचबरोबर शेतकरी भाजीपाला, फुलशेती, फळशेतीही करू शकतील. त्याचबरोबर आजूबाजूच्या वीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल. पाण्याच्या पातळीत वाढ होईल. कुपनलिका, विहिरीचे पाणीही वाढण्यास मदत होईल.सुरेश पवार यांचे २००३ पासून प्रयत्न सुरूराष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व खानिवली गावचे माजी सरपंच सुरेश पवार हे नागनाथ येथे बंधारा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. २००३ पासून ते शासन दरबारी पत्रव्यवहार करीत आहेत. ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष स्व.बबनराव पाटील व कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन उपाध्यक्ष गोटीराम पवार यांनी नागनाथ येथे शासकीय दौरा केला होता. यावेळी त्यांनीही या बंधाºयामुळे शेती हिरवीगार होईल, असा आशावाद व्यक्त केला होता.चांगल्या बंधाºयांची गरज : तालुक्यातील शेतकºयांचा विकास करायचा असेल तर येथील सर्व नद्यांवर १० किलोमीटर अंतरावर गळती न होणारे चांगले बंधारे बांधले पाहिजेत. या बंधाºयांच्या पाण्यावर परिसरातील सर्व खेड्यांमध्ये उपसा जलसिंचन योजना राबवून जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणली पाहिजे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.लाभक्षेत्रात येणारीगावे व जमिनीचे क्षेत्रआंबिस्ते खुर्द २२९ हेक्टरआंबिस्ते बु. ५८९ हेक्टरखानिवली १८९ हेक्टरआब्जे ३६६ हेक्टरवैतरणा नगर २७२ हेक्टरनिचोळे २७३ हेक्टरभावेघर १८३ हेक्टरया बंधाºयाच्या कामाच्या सर्वेक्षणाचे काम याच वर्षी करण्यात आले आहे. नाशिक जलसंधारण विभागाकडून पाणी साठ्याचे प्रमाणपत्र उपलब्ध झाले की हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविणार आहोत.- ए.बी.फुंदे, जलसंधारण विभाग, ठाणेबिलोशी, वसुरी, खरीवली, पालसई, खुपरी, बिलावली, देवघर, गौरापूर, बोरांडा, घोडमाळ, पिंपळास, चनेमान, खरीवली, टकली, मांडा, भोपीवली, आपटी, देवळी या गावांचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल.नागनाथ येथे श्री कालभैरव व श्री शंकराचे देवस्थान आहे. या देवस्थानची सुमारे ३५० एकर जमीन आहे. येथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते तर दररोज शेकडो भक्तगण येथे येत असतात.कमी खर्चात जास्त गावांना फायदानागनाथ येथे बंधारा बांधून हे पाणी वसुरी येथील नाल्यात सोडल्यास सुमारे दहा ते पंधरा कि.मी. अंतरावर या पाण्याचा फायदा शेतकºयांना होईल. त्यासाठी कालवा काढण्याची गरज पडणार नाही. पिण्याच्या पाण्यासाठी संयुक्त पाणी योजना राबवल्यास त्याचा लाभ पंचवीसहून अधिक गावांना होऊ शकतो. हेच पाणी उद्योजकांनाही देणे शक्य असल्याने त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटेल.