पालघर : सरकारी धोरणांमुळे हुतात्मा झालेल्या शेतकरी, शेतमजूर व सैनिक यांना अभिवादन करण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची शहीद अभिवादन व शेतकरी जन-जागरण यात्रा शनिवारी पालघरमध्ये दाखल झाली.सरकारची उदासीनता आणि निसर्गाची वारंवार येणारी संकटे यामुळे शेतकरी आणखीन संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी दबाव वाढविणे आवश्यक आहे. अलीकडेच शेतकऱ्यांनी संप करून अभूतपूर्व इतिहास घडविला होता. या यात्रेतून राज्यभर शेतकरी जागर करण्यात येणार असून २७ एप्रिल रोजी पुणे येथे यात्रेची समाप्ती करताना संपानंतरच्या दुसºया आंदोलनाची घोषणा कारण्यात येईल असे या यात्रेदरम्यान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील, सुकाणू समितीच्या सदस्य सुशीलाताई मोराळे तसेच सुकाणूचे कार्यवाह व पदाधिकारी यांनी सांगितले. यात्रेच्या स्वागतासाठी विविध संघटनांचे नेते व कार्यकर्ते जमले होते.यावेळी पालघरमधील विविध संघटनांनी या यात्रेच्या स्वागतानंतर हुतात्मास्तंभ येथे शेतकºयांवर झालेल्या अन्यायाविरोधात सुकाणू समितीने सुरु केलेल्या यात्रेस पाठिंबा देत राज्यासह देशात ज्याप्रमाणे शेतकºयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे ते, निंदनीय असून त्यासाठी हा लढा उभारलाच पाहिजे. शेतकºयांनी जागरूक होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढलेच पाहिजे असे सांगितले.हे सरकार शेतकºयांना समृद्ध करू असे म्हणत असताना दुसरीकडे या जिल्ह्यातील शेतकºयांच्या जमिनी विविध प्रकल्पांमध्ये हस्तांतरित करून त्यांना सुजलाम करणारे पाणी इतरत्र वळवून सिंचनातून बाद केल्या व त्यांना देशोधडीला लावण्याचे काम या सरकारने केले असल्याचे स्पष्ट होत आहे. या विरोधात जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी या सुकाणू समितीसोबत असेल अशी ग्वाही शेतकरी संघर्ष समितीचे संतोष पावडे, खरेदी विक्र ी संघाचे महेंद्र अधिकारी, कुणबी सेनेचे जितेंद्र राऊळ, काँग्रेसचे केदार काळे, जनता दलाचे प्रकाश लवेकर,मच्छीमार नेत्या पूर्णिमा मेहेर व सूर्या समितीचे ब्रायन लोबो, रमाकांत पाटील यांनी येथे दिली.२७ एप्रिल रोजी पुण्यात समारोप : शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती वीजबिलासहित झालीच पाहिजे. शेतमालावरील निर्यात बंदी उठली पाहिजे. शेतमाल उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा मिळाला पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे रद्द झाले पाहिजेत. ही यात्रा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधून २३ मार्च रोजी सुरु झाली असून पुढे बेळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नासिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वसीम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर सातारा मार्गे २७ एप्रिल रोजी पुणे येथील महात्मा फुलेवाडा येथे पोचून समारोप होणार आहे.
शेतकरी जनजागरण यात्रा पालघरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:54 AM