शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नालासोपाऱ्यात 10 वर्षांत फेरीवाल्यांसाठी झोन नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 1:23 AM

फेरीवाल्यांमध्ये नाराजी ; मनपाची रणनीती नाही, प्रस्ताव रखडलेलाच

मंगेश कराळेनालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेची स्थापना होऊन १० वर्षे उलटली, तरी नालासोपा-यातील फेरीवाल्यांचा प्रश्न काही मिटलेला नाही किंवा त्यांच्यासाठी कोणतीही रणनीती आखलेली नाही. फेरीवाल्यांसाठी वसई-विरार मनपाने नालासोपा-यात फेरीवाला झोन बनवलेलाच नाही. सरकारी, आरक्षित जमिनींवर विविध बांधकामे होतात, पण फेरीवाला झोन का बनत नाही. या फेरीवाल्यांकडून महापालिकेला मोठा महसूल मिळतो, तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि वेळप्रसंगी कारवाई का होते? की त्यामागेही कोणते राजकारण आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नालासोपारा पूर्वेकडे ज्यावेळी नगर परिषद होती, त्यावेळी ३ जुलै १९९८ ला एक प्रस्ताव पास करून चंदननाका, सेंट्रल पार्क आणि एसटी डेपो येथे अस्थायी स्वरूपात तीन ठिकाणी फेरीवाला झोन बनवले होते. त्यावेळी नालासोपा-यात फेरीवाल्यांची संख्या अंदाजे ४००च्या जवळपास होती. वाढत्या लोकसंख्येमुळे आता फेरीवाल्यांची संख्या जवळपास ५०००हजार इतकी झाली आहे. फळे, फुले, भाजी, हार, कपडे, गृहोपयोगी वस्तू, सौंदर्यप्रसाधने, कटलरी अशा जवळपास सर्वच वस्तू अनेक व्यापारी रस्त्यावर विकून आपले घर चालवतात. 

नालासोपा-यात सरकारी आणि आरक्षित जमिनीवर अनधिकृत इमारती बनवत आहेत, पण यापैकी कोणत्याही जागेवर फेरीवाला झोन मनपा का बनवत नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे. नालासोपारा पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील जे काही मुख्य रस्ते आणि त्या अंतर्गत जे काही रस्ते आहेत, त्यावर अनेक फेरीवाले बसून आपला व्यवसाय करतात. परिणामी वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो.मनपाचे अतिक्रमण विभाग फेरीवाल्यांवर कारवाई करून गाड्या जप्त केल्या जातात. दुकाने जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकतात. पण, यांच्याकडूनच मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. पण, यांच्यासाठी फेरीवाला झोन का बनवत नाही? यातही काही राजकारण आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

फायलीत बंद १०४ मार्केट झोनफेरीवाल्यांच्या समस्या पाहून दोन वर्षांपूर्वी मनपाने हद्दीतील प्रभागात १०४ मार्केट झोन बनविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण, दोन वर्षे होऊनही प्रस्ताव अजून फायलीत बंद आहे. असा ठराव महासभेत २०१८ किंवा २०१९ साली झाला होता, पण अद्याप काही झाले नसल्याचे माजी नगरसेवकाने लोकमतला सांगितले. 

आम्ही मागील १५ वर्षांपासून रस्त्यावर भाजी विकून पोट भरतो. मनपाचा रोड टॅक्स आणि कर भरतो, मग मनपा फेरीवाला झोन का बनवत नाही?- राजेंद्र यादव, भाजीविक्रेता

जास्त फेरीवाले हे परप्रांतीय आहेत, म्हणून मनपा फेरीवाला झोन बनवत नाही की काय, असा आम्हाला आता संशय येतो. निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळी मतदार म्हणून आमचा वापर करतात. पण, निवडणुका झाल्या की, आम्हाला परत रस्त्यावर सोडतात.    - भारती गुप्ता, भाजीविक्रेती

मनपाला प्रस्ताव दिला होता, पण काही  तांत्रिक अडचणी होत्या म्हणून परत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. नंतर तो प्रस्ताव प्रभाग समितीनिहाय ठरावात येणे अपेक्षित होते पण तो आला नाही. निवडणुका आणि कोरोनामुळे हा प्रस्ताव झालेला नाही.- संजय हिणवार, फेरीवाला पथकाचे अधिकारी, वसई विरार महानगरपालिका) 

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnalasopara-acनालासोपारा