शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

नालासोपारा एसटी डेपोत व्हीलचेअरच नाही, रॅम्पचा घेतला जातो आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 3:29 AM

Nalasopara ST Depot : शहरातील एसटी डेपोमध्ये ज्येष्ठ व अपंगांसाठी एकही व्हीलचेअर नसून त्यांना रॅम्पचा आधार घेत बसमध्ये प्रवेश घ्यावा लागत आहे.

- मंगेश कराळेनालासोपारा : शहरातील एसटी डेपोमध्ये ज्येष्ठ व अपंगांसाठी एकही व्हीलचेअर नसून त्यांना रॅम्पचा आधार घेत बसमध्ये प्रवेश घ्यावा लागत आहे. मात्र, वृद्ध आणि अपंगांना बसमध्ये प्रवेश घेताना त्रास होणार नाही याची काळजी डेपोमधील कर्मचारी घेत असल्याची माहिती बसस्थानक प्रशासनाकडून देण्यात आली.नालासोपारा हे पश्चिम रेल्वेवरील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला जवळच हा डेपाे आहे. या डेपोतून ठाणे, बोरीवली, दापोली, कोल्हापूर, सांगोला, लातूर, गेवराई, रत्नागिरी, अलिबाग, जेजुरी, झांझवड, खेड, गुहागर, स्वारगेट अशा विविध ठिकाणी बस रवाना हाेतात. आजूबाजूच्या तालुक्यांतील विविध गावांसाठीही येथून बस आहेत. दररोज इतर व तालुक्यात अनेक ठिकाणी १३० बस सोडतात. त्यामुळे या डेपोतून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. त्यात दिव्यांग आणि अपंगांची संख्या तुरळक असते. तर ज्येष्ठ नागरिकही थोड्या फार प्रमाणात प्रवास करतात. त्यांना व्हीलचेअर नसल्याने रॅम्पचा आधार घ्यावा लागत आहे. व्हीलचेअर नसल्याने गैरसोयनालासाेपारा स्थानकात व्हीलचेअरच नसल्यामुळे दिव्यांग प्रवाशांचे हाल हाेत आहेत. त्यांना गाडीपर्यंत जाताना अनेकदा खूप त्रास हाेत आहे. याबाबत काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. 

बसस्थानकात व्हीलचेअर नाही, पण रॅम्प बनविण्यात आले आहेत. आजपर्यंत व्हीलचेअरची गरजच भासली नाही. डेपोमधील कर्मचारी आणि स्टाफ कोणालाही बसमध्ये चढण्या व उतरण्यासाठी त्रास होणार नाही याची दक्षता घेतात. याबाबत त्यांना लक्ष घालण्यास सांगितले आहे.- प्रज्ञा सानप-उगलेआगार व्यवस्थापक, नालासोपारा डेपो  

 रॅम्पची सुविधा नाहीनालासोपारा एसटी डेपोमध्ये दिव्यांग, अपंग आणि ज्येष्ठांसाठी व्हीलचेअर नाही. मात्र, एकमेव रॅम्प आहे. त्याचा वापर हाेत आहे. परंतु एकच रॅम्प असल्यामुळे माेठी गैरसाेय हाेत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, वृद्धांसाठी आणखी रॅम्प उपलब्ध करण्याची मागणी हाेत आहे. वसई, विरार आणि नालासोपारा स्थानकांत व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध नाही. याबाबत संघटनेच्या माध्यमातून पत्रव्यवहार केलेला आहे. पण, ती अद्यापपर्यंत कुठेही सुरू झालेली नाही.- देवीदास केंगार, अध्यक्ष, अपंग जनशक्ती 

व्हीलचेअरबाबत विचारणा केली तर ती सुविधा उपलब्ध नाही. मला दररोज बसमध्ये चढण्यासाठी किंवा इतर दिव्यांग, अपंगांना त्रास होणार नाही याची डेपोतील कर्मचारी, स्टाफ जातीने लक्ष घालून मदत करतात.- जनार्दन पाटील, ज्येष्ठ नागरिक, प्रवासी

टॅग्स :state transportएसटीVasai Virarवसई विरार