नालासोपारा : वसई विरारमध्ये मागील दोन दिवसांत सात कोटी रुपये रोकड सापडल्याच्या पार्श्वभूमीवर वालीव पोलिसांनी शनिवारी सकाळी वालीव फाटा येथून तीन लाख रुपयाची नवीन भांडी वाटपासाठी आलेला टेंपो पकडला आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने स्टीलची भांडी वाटप करण्यात येणार असून सदरची स्टीलची भांडी ही टेम्पो क्रमांक एमएच ४८ डिसी २३९३ मधुन शिव भीम नगर, वलिव, वसई पूर्व येथून जाणार असल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्यातील एटीसी विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांना मिळाली होती. नमूद ठिकाणी त्यांनी त्यांच्या पथकांसह नाकाबंदी करून टेंपो ताब्यात घेतला. त्यामध्ये स्टीलची नवीन भांडी आढळून आली आहेत. पोलीस याची पुढील चौकशी करत आहे.