नालासोपारा : शनिवारी होणाऱ्या दहीहंडीच्या सणानिमित्त शहरातील पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत. नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा होत असून कोणताही अनुचित प्रकार घडून या सणाला गालबोट लागू नये, म्हणून नालासोपारा आणि तुळिंज पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहे.नालासोपारा पश्चिमेकडे २ मोठ्या सार्वजनिक दहीहंड्या बांधल्या जातात. याव्यतिरिक्त सोसायट्यांमध्ये आणि लहान मुलांची दहीहंडी सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते. पश्चिमेकडील पाटणकर पार्क, पांचाळ नगर, चक्रेश्वर नगर, समेळ पाडा, श्रीप्रस्था, निळेगाव येथे दहीहंडीचे आयोजन केले जाते. नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये २ सार्वजनिक मंडळांनी पत्र व्यवहार करून रीतसर परवानगी घेतली आहे. यावेळी नालासोपारा पोलीस सिव्हिक सेंटर, बुºहाण चौक, साईनाथनगर, समेळ पाडा, धनंजय स्टॉप, टाकी रोड, हनुमान नगर, श्रीप्रस्था, निळेगाव येथे २ - २ पोलीस कर्मचारी तैनात करणार आहेत. तसेच नाकाबंदी केली जाणार आहे. एकंदर ६ अधिकारी आणि ३० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी हजर राहतील.तर पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० सार्वजनिक आणि अंदाजे १८५ लहान दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत. रस्त्यावर दहीहंडी उत्सव करू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाणार असल्याची ताकीद दिली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी तुळिंज पोलीस २-२ कर्मचारी बंदोबस्तासाठी ठेवणार आहेत. याशिवाय चंदननाका, टाकी रोड, रेहमत नगर, सितारा बेकरी, संतोष भवन, टोलनाका, प्रगती नगर, धानिवबाग, अलकापुरी येथे २ - २ पोलीस कर्मचारी असतील. एक विशेष पथक स्पीकरचा आवाज किती डेसिबल आहे ते मोजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.दहीहंडीनिमित्त २ पोलीस निरीक्षक, १४ अधिकारी, ९६ पोलीस कर्मचारी, १० होमगार्ड आणि ४ महिला पोलीस मुख्य नाक्यावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. याबाबत न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत. ते पाळावे अन्यथा मंडळावर तसेच रस्त्यावर दहीहंडी साजºया करणाºयावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करणार. १४ वर्षाखालील मुलांचा वापर थरांमध्ये करू नये अन्यथा पालक आणि मंडळावर गुन्हे दाखल होतील, असे तुळिंजच्या वपोनि यांनी सांगितले.४६५७ गोविंदांना मोफत विमावसई : शनिवारी होणाºया दहीहंडी उत्सवासाठी ७८ गोविंदा पथकांनी महानगरपालिकेत नोंदणी केली असून एकूण ७५ पथकातील सुमारे ४६५७ गोविंदांना वसई विरार महानगरपालिकेने विमा कवच दिले आहे. पंधरा ते वीस फूट उंचीचा हंड्या काही ठिकाणी लावल्या जातात. या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथक कसून सराव करतात. गोविंदा पथकात समाविष्ट गोविंदांच्या सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून गेल्या काही वर्षापासून गोविंदा पथकांना मोफत विमा देण्याची योजना महानगरपालिकेने राबविले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महानगरपालिकेने मध्यंतरी आवाहन केले होते. मात्र, सुरुवातीस या योजनेस अत्यल्प प्रतिसाद होता.
नालासोपारा, तुळिंज पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज; पथकांचा विमाही उतरवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:29 AM