नालासोपारा : शहराच्या पश्चिमेकडील पाटणकर पार्क रोडवरील इम्पिरियल टॉवर मध्ये राहणाऱ्या पवार कुटुंबात वाद होऊन त्यात आईवर पोटच्या मुलानेच जीवघेणा हल्ला केला होता. केईएम रुग्णालयात तब्बल १८ दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या नर्मदा पवार (५०) यांचा शनिवारी अखेर मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी जन्मेश पवार (२०) याचा शोध सुरु केला आहे.
सोमवार २९ जानेवारीला पहाटे पावणे चारच्या जन्मेश याने चाकू, सुरा, हाथोडी आणि स्क्रू ड्रायव्हरने त्याच्या आई वडिलांवर हल्ला केला होता. यात त्याने तब्बल ४० वार केले होते. पोलिसांनी दोघांना उपचारासाठी मुंबईच्या केईएम रु ग्णालयात भरती केले होते. जखमी वडील नरेंद्र पवार हे बरे होऊन घरी परतले पण आई (नर्मदा) ही जास्त जखमी असल्याने अतिदक्षता विभागात उपचार घेत होती.वार केल्यानंतर तो कपडे बदलून निघून गेलानालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर पार्क रोडवरील इम्पिरियल टॉवरच्या सी विंग मधील रूम नंबर २०२ मध्ये वडील नरेंद्र पवार आणि आई नर्मदावर मुलगा जन्मेश याने पैशाच्या वादातून मोठा वाद झाला. पावणे चारच्या सुमारास स्क्रू ड्रायव्हर, सुरा, एक चाकु आणि हाथोड्याच्या सहाय्याने झोपलेल्या आई, वडिलांवर जिवघेणा हल्ला केला. त्यानंतर कपडे बदलून पहाटे साडेचारच्या दरम्यान तो घरातून पळून गेला होता.
जखमी नर्मदा पवार यांना जास्त प्रमाणात डायबिटीस असल्यामुळे त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली नाही. रु ग्णालयातून कागदपत्रे आल्यानंतर आरोपी जन्मेश विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करणार आहोत.- के. डी. कोल्हे, पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे