विक्रमगड : परिसरातील गावांमध्ये पाणी टंचाई होऊ नये म्हणून सहा वर्षांपूर्वी येथे राष्टÑीय पेय जल योजने अंतर्गत टेटवाळी, उघाणीपाडा, हातणे, उटावली उपराळे या गावांमध्ये या योजनेची अम्मल बजावणी झाली असली तरी किरकोळ कामे अपुर्ण असल्याने योजना अद्याप सुरु होऊ शकलेली नाही.या योजने अंतर्गत विहिरीची कामे झाली असली तरी त्यातील पाणी अजून गावकऱ्यांना मिळालेले नसल्याचे वास्तव आहे. पाण्याचा टाक्याचे काम, पाईप लाईन व काही किरकोळ कामे रखडलेली आहेत. मात्र, त्याबाबत ना जिल्हापरिषद पाणीपुरवठा विभागाकडून उत्तर मिळत ना ग्रामपंचायती कडून अशी स्थिती आहे. या योजनांची कामे ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या असून यावर मोठ्याप्रमाणात खर्च झालेल्या असतानाही त्या अपुर्णच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.या बाबत पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता ग्रामसेवक संरपच व त्या समितीची बैठक नुकतीच झाली असून शिल्लक निधीतून उर्वरित कामे करण्याचे ठरले आहे. तसे न झाल्यास आवश्यक निधी पाणीपुरवठा विभागाच्या यांच्या खात्यात जमा करा म्हणजे या योजना पाणीपुरवठा विभाग पुर्ण करेल असे ठरले आहे. मात्र हे कधी होणार या बाबत ठोस माहिती मिळाली नाही. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्ची पडल्यानंतरही या योजना पडून राहत असतील तर हे गंभीर असल्याचे मा. क.प. चे किरण गहला यांनी सांगितले.
राष्ट्रीय पेयजलच्या नळ पाणी योजना अपूर्णच; किरकोळ कामांचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 11:54 PM