शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

नवी मुंबई पोलीस संघ अव्वल

By admin | Published: December 15, 2015 12:44 AM

तारापूर येथे आयोजित केलेल्या ‘४२ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेतील बहुसंख्य क्रीडा प्रकारांमध्ये नवी मुंबई जिल्हा पोलीस संघाने सर्वात जास्त गुण मिळवून अव्वल स्थान

बोईसर : तारापूर येथे आयोजित केलेल्या ‘४२ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेतील बहुसंख्य क्रीडा प्रकारांमध्ये नवी मुंबई जिल्हा पोलीस संघाने सर्वात जास्त गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले असून त्याला विजेते पदाची ट्रॉफी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.तारापूर अणुऊर्जा केंद्र वसाहतीच्या भव्य मैदानावर ८ ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजित केलेलया या स्पर्धेमध्ये पालघर, ठाणे ग्रामीण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई असे एकूण सहा जिल्हा पोलीस संघ सहभागी झाले होते. तर त्या स्पर्धेत अ‍ॅथलेटीकस, खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, जलतरण, कुस्ती, वेटलिफ्टिींग, क्रॉसकंट्री, बॉक्सिंग, फुटबॉल, मॅरेथॉन, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, हॅमरफेक, उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.महिला सर्वसाधारण स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने ८० गुण मिळवून प्रथम, पुरुष सर्वसाधारण स्पर्धेत नवी मुंबई संघाने १४६ गुण मिळवून प्रथम, महिला (सांघिक) स्पर्धेत नवी मुंबई संघाने ११७ गुण मिळवून प्रथम तर पुरुष (सांघिक) स्पर्धेत नवी मुंबई संघाने २०५ गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला. या स्पर्धेत सुमारे साडे सहाशे क्रीडापटू सहभागी झाले होते.स्पर्धेच्या समारोप व पुरस्कार वितरण प्रसंगी अधीक्षक राजेश प्रधान अप्पर पोलीस अधीक्षक वाय.बी. यशोद व श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस उपविभागीय अधिकारी जयंत बजबले (पालघर), विशाल गायकवाड (बोईसर), सचिव पाडकर (डहाणू), नरसिंह भोसले (वसई), प्रदीप जाधव (जव्हार) इ. सह राजकीय सामाजिक, उद्योग व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात कुठल्याही सोयीसुविधा नसतानाही शून्यातून उभ करून स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक शारदा राऊत व त्यांच्या टीमचे अभिनंदन करून यशस्वी स्पर्धकांचे कौतुक केले तर शारदा राऊत यांनी स्पर्धेचा आढावा घेतला तत्पूर्वी पत्रकार व पोलीस अधिकारी यांच्यामध्ये रस्सीखेच स्पर्धा झाली त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी बाजी मारतो.