- राज चिंचणकरमुंबई : मुंबईच्या मध्यवर्ती भागात परळगाव वसले आहे आणि या परिसरात ‘गोलंजी हिल’ नामक टेकडी आहे. या गोलंजी हिलवरच चंडिका देवीचे स्थान आहे. या देवीची स्थापना १९२६ मध्ये करण्यात आली. हे मंदिर परळगावातील पाठारे क्षत्रिय समाजाचे मंदिर आहे. मंदिराच्या या परिसराला ‘चंडिका संस्थान’ असे नामाभिमान आहे.चंडिका देवीचे मंदिर चिरेबंदी आहे. आजही या मंदिराने आपला ग्रामीण बाज जपला आहे. प्रशस्त सभामंडप असलेल्या या मंदिरात आल्यावर शीतल वातावरणाचा अनुभव येतो. या मंदिरात चंडिका देवीची उभी मूर्ती असून ती चतुर्हस्त आहे. तलवार, त्रिशूळ, खड्ग धारण केलेली आणि एक हात आशीर्वादरूपी, असे तिचे स्वरूप आहे.प्रसन्नवदने अशी ही देवी नजर खिळवून ठेवते. ही मूर्ती परळगावच्या हद्दीत सापडली, असे सांगण्यात येते. मात्र या मूर्तीचा जुना इतिहास ज्ञात नाही. पाठारे प्रभूंसह सोनार समाजाचीही ती कुलदेवता आहे. तर, परळगावातील स्थानिकांची चंडिका ही ग्रामदेवता आहे. अष्टमीला होमहवन केले जाते. चंडिका देवी मंदिराच्या परिसरातच व्याघ्रेश्वरी व बारादेवीचीही मंदिरे आहेत.
Navratri : परळचे चंडिका संस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 12:43 AM